राजस्थानमध्ये हवाई दलाच्या तळाजवळ आढळला बॉम्ब

राजस्थानमध्ये  हवाई दलाच्या तळाजवळ आढळला बॉम्ब

गेल्या काही दिवसांपासून दशतवाद्यांकडून भारतीय सैन्याच्या तळांना टार्गेट केल जात आहे. नुकतच राजस्थानातील नाल-बिकानेर मध्ये हवाई दलाच्या तळाजवळ एक जिवंत बॉम्ब आढळला आहे. या जिवंत बॉम्बमुळे एकच खळबळ उडाली आहे. या बॉम्बची तपासणी करण्यासाठी हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी आले आहेत.


याआधी पठाणकोट, उरी मध्ये असणाऱ्या लष्करी तळावर अशाचप्रकारे दहशतवाद्यांनी हल्ला घडवून आणला होता. यात अनेक जवान शहीद झाले होते. त्यातच राजस्थानातील नाल-बिकानेर मध्ये हवाई दलाच्या तळाजवळ जिवंत बॉम्ब आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. सध्या तपासणी सुरू असल्यामुळे याबाबत अधिक माहिती मिळालेली नाही.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून हवाई हल्ला केला होता. यात पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मदचा तळ या भारतीय सैन्यांनी नेस्तनाबुत केला. त्यामुळे या हल्ल्यानंतर दहशताद्यांकडून पुन्हा एकदा भारताला टार्गेट केलं जाऊ शकतं अशी शक्यता गुप्तचर विभागाने वर्तवली होती. देशभरात हायअलर्टही जारी करण्यात आला होता. हा जिवंत ब़ॉम्ब त्याचाच एक भाग आहे का? याचा सध्या तपास सुरू आहे.

First Published on: April 3, 2019 12:25 PM
Exit mobile version