‘धनंजय माने इथेच राहतात का’ : मीम्स बनविणाऱ्याने घेतली अशोक सराफांची भेट

‘धनंजय माने इथेच राहतात का’ : मीम्स बनविणाऱ्याने घेतली अशोक सराफांची भेट

मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीमध्ये आपल्या अभिनयाने अमेट ठसा उमटवणारे जेष्ठ अभिनेते अशोक सराफ(ashok saraf) यांनी या वर्षी त्यांच्या वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली आहे. एक परिपूर्ण अभिनेते आणि व्यक्तीमत्व असलेलया अशोक सराफ यांचे अनेक चाहते आहेत. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच जण अशोक मामांचे फॅन्स आहेत. अशोक सराफ यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे आणि या पुढेही असेल. मागच्या काही काळापासून सोशल मीडियावर अशोक सराफ यांचे मीम्स व्हायरल होताना दिसत आहेत. अश्याच एका मीम्स(memes) बनविणाऱ्याला अशोक सराफ यांना त्यांच्या चक्क त्यांच्या घरी जाऊन भेटण्याची संधी मिळाली.

हे ही वाचा – अशोक पत्कींच्या संगीत साजाने पुन्हा एकदा साकारतोय ‘श्यामची आई’ चित्रपट

अशोक सराफ म्हणजेच सर्वांचे लाडके अशोक मामा यांना भेटल्या नंतर तो अनुभव सांगण्यासाठी ‘आम्ही मीमकरने’ त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ‘आम्ही मीमकरने'(amhi memekar) अशोक सराफ यांच्या सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात तो अशोक सराफ यांच्या घरी असल्याचे दिसत आहे. अशोक मामांसोबतचा हाच फोटो शेअर करत ‘आम्ही मीमकरने’ एक पोस्ट सुद्धा शेअर केली आहे त्यात तो म्हणाला.

हे ही वाचा – जेव्हा अशोक सराफ बनतात ‘लव्हगुरू’


“धनंजय माने विथ ओरिजनल धनंजय माने.
लहानपणापासून उराशी बाळगलेलं एक स्वप्न आज पूर्ण झालंय. ज्या विनोदवीराचे चित्रपट पाहत लहानाचा मोठा झालो, ज्यांच्या संवादामधून प्रेरणा घेऊन मीम्स बनवायला लागलो त्या मराठी चित्रपटसृष्टीतल्या सुपरस्टार, विनोदाचे बादशाह, आपल्या अफलातून टायमिंगने कोणत्याही विनोदाला न्याय देणारे आपल्या सर्वांचे लाडके धनंजय माने(dhananjay mane) म्हणजेच माननीय अशोकमामा ह्यांना थेट त्यांच्या घरी जाऊन भेटता आलं आणि यासाठी मी सर्वप्रथम झीमराठीचे अगदी मनापासून आभार मानतो”, असं ‘आम्ही मीमकर म्हणाला.

हे ही वाचा –  ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’, हाऊसफुल्ल ५०० प्रयोग

पुढे तो असंही म्हणाला, की “कोणत्याही सेलिब्रिटीला भेटायचं म्हणजे मनावर थोडं दडपण येतंच आणि त्यात ते सेलिब्रिटी अशोक मामा आणि निवेदिता मॅडम(nivedita saraf) असतील तर काही विचारूच नका. सुरुवातीला थोडी धाकधुक होती पण त्यांच्याशी बोलायला लागल्यावर सगळी भीती एका क्षणांत पळून गेली आणि सुमारे दोन तास त्यांच्यासोबत मनमोकळेपणाने गप्पा मारता आल्या. मी मागे एकदा म्हटलं होतं की मराठी कलाकारांचा साधेपणा प्रत्येक मराठी माणसाला आपलंसं करतो. आज पुन्हा एकदा तोच अनुभव आला. आपण स्वतः कुणी मोठे असल्याचा भाव अजिबात न बाळगता त्यांनी आमच्याशी अगदी आपुलकीने गप्पा मारल्या. अशोक मामा आणि निवेदिता ताईंनी तर आमचे आधीचे मीम्स सुद्धा आवर्जून पाहिले आणि अशोक मामांनी ह्युमर कसा असावा, विनोद करताना त्यात विरोधाभास असणं किती महत्वाचं आहे, याबाबत खूप छान मार्गदर्शन केलं. आमच्या मीमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडूनच हे सगळं शिकायला मिळणं हे आमच्यासाठी खूपच फायद्याचं होतं.”

हे ही वाचा – समीर-शेफालीचा एकमेकांसाठी भन्नाट उखाणा, सोशल मीडियावर चर्चा

 

अशोक मामांच्या भेटीदरम्यान ‘आम्ही मीमकर पुढे असंही म्हणाला, “आम्ही मीमकरच्या वतीने अशोक मामांच्या चित्रपटातील संवाद असलेले टीशर्ट त्यांना भेट म्हणून दिले आणि ते टीशर्ट पाहून त्यांना आणि निवेदिता ताईंना फार आनंद झाला. आज इतकी वर्ष होऊनसुद्धा आताची तरुण पिढी त्यांचे जुने चित्रपट तेवढ्याच उत्साहात पाहतात हीच त्यांची ऊर्जा असल्याचं निवेदिता ताईंनी सांगितलं. निघताना त्यांनी आम्हाला ‘बहुरूपी अशोक’ हे पुस्तक स्वतः सही करून स्वतःच्या हाताने भेट म्हणून दिलं आणि इथेच आम्हाला आकाश ठेंगणं झाल्यासारखं वाटलं.
आयुष्यभर मिरवणार एखाद्या दागिन्या सारखं.”

हे ही वाचा –  ‘सिनेसृष्टीत घराणेशाही ही नेहमीच असणार, पण…’, अभिनेता राजकुमार रावचं स्पष्ट मत

अशोक सराफ यांना प्रत्यक्ष भेटण्याचा अनुभव घेतल्यांनंतर ‘आम्ही मीमकरने’ त्याच्या भावना शब्दांत व्यक्त केल्या. अशोक सराफ यांच्या प्रत्येकच भूमिका ह्या विशेष लक्षवेधी ठरल्या आहेत. भूमिका कोणतीही असो ती अशोक सराफ साकारणार असतील तर त्याला आणखीनच महत्व प्राप्त होतं. ‘अशी ही बनवा बनवी’ हा चित्रपट सुद्धा मराठी चित्रपटांच्या इतिहात अजरामर आहे. ‘धनंजय माने'(dhananjay mane) ही व्यक्तीरेखा याच चित्रपटातली आहे. हा चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी मन भरत नाही. याचित्रपटातील ‘धनंजय माने’सह इतरही भूमिका नेहमीच प्रेक्षकांच्या लक्षात राहतील.

हे ही वाचा –  ‘गोव्याला गेलो तरी २० – २५ हजार खर्च होतात’. संतोष जुवेकरची दत्तक…

First Published on: July 7, 2022 8:55 AM
Exit mobile version