हिंदू धर्मात विविध सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. हिंदू धर्मात नवरात्रीला महत्वाचे स्थान प्राप्त आहे. यामुळेच वर्षातून चार वेळा नवरात्र साजरी केली जाते. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 विविध रूपांची पूजा केली जाते. संपूर्ण वर्षभरात एकूण चार नवरात्री असतात. पहिली नवरात्री चैत्र महिन्यात असते तर शारदीय नवरात्री जी अश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर दोन नवरात्री ह्या गुप्त स्वरूपात असतात. परंतु चैत्र आणि अश्विन नवरात्रीला भारतात मोठ्या प्रमाणात साजरी केले जाते.
यंदा चैत्र नवरात्र 22 मार्च पासून सुरु होणार असून ती 30 मार्चला समाप्त होणार आहे. हिंदू पुराणांच्या मते, नवरात्रीच्या 9 दिवसांच्या काळात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. दरम्यान, नवरात्री सुरु होण्यापूर्वी घर स्वच्छ करुन घरातील काही गोष्टी बाहेर काढायल्या हव्या, ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते.
नवरात्रीपूर्वी घरातून बाहेर काढा ‘या’ गोष्टी
- देवी-देवातांची खंडीत मूर्ती किंवा फोटो
वास्तू शास्त्रानुसार, घरामध्ये कधीही देवी-देवतांची खंडीत मूर्ती किंवा फोटो ठेवू नये. कारण यामुळे घरात दुर्भाग्य येते.
- फुटलेली काच
वास्तू शास्त्रानुसार, फुटलेली काच किंवा आरसा ठेवणं देखील अशुभ मानलं जातं. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.
- फाटलेली धार्मिक पुस्तकं
वास्तु शास्त्रानुसार, घरामध्ये कधीही फाटलेली धार्मिक पुस्तकं ठेऊ नये. यामुळे घरात सतत कलह निर्माण होतात.
- बंद घड्याळ
वास्तु शास्त्रानुसार, घरामध्ये बंद घड्याळ ठेवल्यास वास्तूदोष निर्माण होतो. त्यामुळे जर घरात बंद घड्याळ असेल तर ते लगेच सुरु करावे नाहीतर घराबाहेर काढावे.
- जळमटं
नवरात्रीपूर्वी घरातील जळमटं, घुळ काढून संपूर्ण घर स्वच्छ करावे. यामुळे घरात प्रसन्न वातावरण निर्माण होते.
हेही वाचा :