Saturday, April 27, 2024
घरमानिनीReligiousNavratri 2023 : महाअष्टमी, महानवमीला कन्यापूजनमध्ये द्या 'या' भेटवस्तू

Navratri 2023 : महाअष्टमी, महानवमीला कन्यापूजनमध्ये द्या ‘या’ भेटवस्तू

Subscribe

हिंदू धर्मात लहान मुलींना देवी स्वरूप मानले जाते. त्यामुळे नवरात्रीत कन्या पूजन करण्याची प्रथा आहे. तसेच लहान मुलींना भेट वस्तू देऊन खुश केल्याने देवी देखील आपल्यावर नेहमी खूश राहतात.

नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या विविध रूपांची पूजा-आराधना केली जाते. तसेच नवरात्री आठव्या आणि नवव्या दिवशी म्हणजेच महाष्टमी आणि महानवमीच्या दिवशी कन्या पूजन केले जाते. सोबतच त्यांना काही भेट वस्तू देखील दिल्या जातात. ज्या घरांमध्ये घटस्थापना केली जाते. त्या घरांमध्ये प्रामुख्याने नवरात्रीत लहान मुलींचे पूजन केले जाते. हिंदू धर्मात लहान मुलींना देवी स्वरूप मानले जाते. त्यामुळे नवरात्रीत कन्या पूजन करण्याची प्रथा आहे. तसेच लहान मुलींना भेट वस्तू देऊन खुश केल्याने देवी देखील आपल्यावर नेहमी खूश राहतात. मात्र अष्टमी किंवा नवमीला कन्या पूजन दरम्यान लहान मुलींना कोणत्या भेट वस्तू दिल्यास देवी खुश होतात, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

खीर

- Advertisement -


नवरात्रीत अष्टमी किंवा नवमीला कन्या पूजन करताना लहान जेवनामध्ये खीर-पुरी द्या. देवी लक्ष्मीला खीर खूप आवडते. त्यामुळे मुलींना खीर दिल्याने देवी देखील खूश होतात.

फळं

- Advertisement -


कन्यापूजन दरम्यान जेवनामध्ये एक फळं देखील द्या. फळ उपहारात दिल्याने तुमच्या चांगल्या कर्माचे फळ तुम्हाला अधिक पटीने परत मिळेल. फळांमध्ये केळ किंवा नारळ तुम्ही देऊ शकता.

श्रृंगार सामग्री


नवरात्रीत मुलींना जेवनानंतर श्रृंगार सामग्री देखील भेट करा. यामध्ये तुम्ही मेहंदी, कंगवा, आरसा यांचा देखील समावेश करा. देवीला श्रृंगार सामग्री देखील अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे ती भेट म्हणून मुलींना दिल्यास देवी खूश होतात.

दक्षिणा

media.istockphoto.com/id/1339718258/photo/full-fra...
नवरात्रीत मुलींना जेवनानंतर दक्षिणा देखील देऊ शकता. असं केल्यास देवी लक्ष्मी देखील तुमच्यावर खूश होतात. यामुळे तुमची आर्थिक समस्या देखील दूर व्हायला सुरूवात होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या सामर्थ्यानुसार 11,21,51 रूपये देऊ शकता.

फुलं


देवीला विविध रंगाची फुलं देखील खूप प्रिय आहेत. त्यामुळे तुम्ही नवरात्रीत मुलींना गुलाब, मोगरा ही फुलं देखील देऊ शकता.

 


हेही वाचा :

नवरात्रीच्या सातव्या दिवशी करा देवीच्या कालरात्री रुपाची पूजा

- Advertisment -

Manini