Sunday, April 28, 2024
घरमानिनीReligiousनवरात्रीच्या सातव्या दिवशी करा देवीच्या कालरात्री रुपाची पूजा

नवरात्रीच्या सातव्या दिवशी करा देवीच्या कालरात्री रुपाची पूजा

Subscribe

आज शारदीय नवरात्रीचा सातवा दिवस आहे. आजच्या दिवशी देवी कालरात्री रूपाची पूजा-आराधना केली जाते. देवीच्या कालरात्री रूपाला नवदुर्गेतील ङआज शारदीय नवरात्रीचा सहावा दिवस आहे. आजच्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा-आराधना केली जाते. नवदुर्गेतील देवीचे हे रूप उग्र मानले जाते. देवी या कालरात्रीचे तीन नेत्र आहेत. सोबतच देवीच्या हातामध्ये खड्ग आहे. देवीचे वाहन गाढव आहे. देवी कालरात्रीच्या पूजा केल्याने भीती आणि रोगांचा नाश होतो.

देवी कालरात्रीची पूजा कशी कराल

  • नवरात्रीच्या सातव्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ वस्त्र धारण करावे.
  • पूजेच्या ठिकाणी गंगाजल शिंपडून पूजा स्थळ स्वच्छ करावे आणि एक चौरग ठेवावा.
  • त्यावर वस्त्र अंधरावे आणि त्यावर देवीचा फोटो ठेवावा. त्यानंतर देवीला कुंकू,अक्षता,लाल सुगंध फुलांचा हार घालावा.
  • देवीच्या समोर तूपाचा दीवा आणि धूप लावावा.
  • कालरात्री देवीला गुळाचा नैवेद्य अर्पण करावा.
  • त्यानंतर देवी समोर दुर्गा चालीसा किंवा दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पठण करावे.
  • तसेच देवीच्या या देवी सर्वभू‍तेषु मां कालरात्रि रूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः या मंत्राचा जप करावा.

कालरात्री देवीच्या पूजेचे काय आहे महत्व

धार्मिक मान्यतेनुसार, कालरात्री देवीच्या पूजेने साधकाच्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या संकटांचा नाश होतो.
साधकाला देवीचा आर्शिवाद प्राप्त होतो. नकारात्मक शक्तींचा त्रास देखील देवीच्या साधनेने दूर होतो. देवीच्या साधकाला उत्तम आरोग्याची प्राप्ती होते.


हेही वाचा : नवरात्रीच्या सहाव्या दिवशी करा देवी स्कंदमातेची पूजा

- Advertisment -

Manini