Thursday, May 2, 2024
घरमानिनीReligiousGuru Purnima 2023 : गुरु पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा का करावी?

Guru Purnima 2023 : गुरु पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा का करावी?

Subscribe

हिंदू धर्मात गुरू पौर्णिमेला अत्यंत महत्वपूर्ण मानले जाते. असं म्हणतात की, पृथ्वीवर गुरू ईश्वरासमान असतो. या दिवशी आपल्या गुरूची सेवा करण्याची परंपरा आहे. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरू पौर्णिमा साजरी केली जाते. या वर्षी 3 जुलै रोजी गुरू पौर्णिमा असणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, आषाढ पौर्णिमेच्या दिवशी वेदव्यास यांचा जन्म झाला होता आणि शास्त्रात वेदव्यासांना भगवान श्री गणेशाचे गुरू मानले आहे.तसेच व्यास ऋषींनी 18 पुराणांची रचना केली त्यामुळे वेदव्यास ऋषी यांचा जन्मदिवस गुरू पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शास्त्रात सत्यनारायणाची पूजा करण्याचे देखील महत्त्व सांगितले जाते.

गुरु पौर्णिमा तिथी

गुरु पौर्णिमा रविवार , 2 जुलै रोजी रात्री 8:21 सुरु होणार असून सोमवार, 3 जुलै रोजी संध्याकाळी 5:08 पर्यंत समाप्त होणार आहे.

- Advertisement -

गुरु पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा का करावी?

पौराणिक मान्यतेनुसार, गुरु वेदव्यास यांच्यात श्री विष्णूंचा अंश असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे गुरु पौर्णिमेच्या दिवशी घरात सत्यनारायणाची पूजा आणि सत्यनारायणाची कथा ऐकली जाते. विष्णू पुराणामध्ये सांगण्यात आलंय की, पौर्णिमा श्री विष्णूंच्या पूजेसाठी सर्वोत्तम मानली जाते. ज्या कुटुंबात सतत आर्थिक समस्या किंवा आजारपण असतात अशा व्यक्तींनी पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करावी.

ArtStation - Lord Vishnu | The Protector

  • गुरु पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात गंगा जल टाकून स्नान करा.
  • त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करुन सूर्याला अर्घ्य अर्पण करा.
  • त्यानंतर घरातील देवी-देवतांची पूजा करा.
  • गरीब, गरजू लोकांना दान द्या.
  • या दिवशी शक्य असल्यास घरामध्ये श्री सत्य नारायणाची पूजा करा. कथेचे वाचन करा.
  • तसेच श्री विष्णू सहस्त्रनाम आणि नारायण मंत्राचा जप करा.

हेही वाचा :

Guru Purnima 2023 : पौर्णिमेच्या दिवशी भाग्योदयासाठी करा ‘या’ गोष्टींचे दान

- Advertisment -

Manini