Saturday, September 30, 2023
घर मानिनी Religious पिठोरी अमावस्येला का साजरा केला जातो बैल पोळा?

पिठोरी अमावस्येला का साजरा केला जातो बैल पोळा?

Subscribe

बैलपोळा सण श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी साजरा केला जातो. यंदा 14 सप्टेंबर रोजी हा सण साजरा करण्यात येत आहे. बैलपोळा हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागात सुद्धा हा सण साजरा होतो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सण साजरा केला जातो.

पिठोरी अमावस्येच्या दिवशी हा सण असतो. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला पोळ्याच्या दिवशी नांगरापासून आणि शेतीपासून दूर ठेवले जाते. या दिवशी शेतकरी आपापल्या बैलाची सजावट करून बैलांची पूजा करतात. या दिवशी सकाळी बैलांना आंघोळ घालून त्यांना विविध वस्तुंनी सजवतात. गळ्यात सुंदर घंटा, पायात घुंगरू, शिंगाना रंगवतात.

बैल पोळ्याचे महत्त्व

- Advertisement -

My Desi Basket | Bail Pola

बैलपोळा सण शेतकऱ्यांसाठी अंत्यत उत्साहाचा असतो. शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे. त्यामुळे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा ग्रामीण भागातील लोक पोळा साजरा करतात. या दिवशी बैलाची पूजा करून गावभर त्याची वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. गावात मिरवणूक झाल्यानंतर घरी महिला बैलांची पूजा करतात. काही ठिकाणी मातीच्या बैलांची पूजा करून पूजा करतात. या दिवशी गोड-धोड नैवेद्य बैलांना खाण्यासाठी ठोंबरा, पुरणपोळी, कढी, भजे यासारखे वेगवेगळे पदार्थ बनवतात.

देशभरात साजरा होतो बैलपोळा

- Advertisement -

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बैलपोळा सण साजरा केला जात असून मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये देखील शेतकरी वर्ग हा सण साजरा करतो. विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमांध्र भागात देखील पोळा साजरा केला जातो. पोळ्याच्या दिवशी ज्यांच्याकडे बैल नाहीत ते मातीच्या बैलांची पूजा करतात. तेलंगणाच्या उत्तरेकडे भागात बैलपोळा सणाला पुलाला अमावस्या म्हटले जाते. तर काही ठिकाणी ‘बेंदूर’ असे देखील म्हणतात. तर दक्षिणेत या सणाला ‘पोंगल’ आणि उत्तर व पश्चिम भारतात ‘गोधन’ असे म्हटले जाते.


हेही वाचा :

Ganesh Chaturthi 2023 : बाप्पाच्या पूजेमध्ये ‘या’ गोष्टी कधीही अर्पण करु नये

- Advertisment -

Manini