Friday, April 19, 2024
घरमानिनीReligious'या' दिवशी वर्षातले पहिले चंद्रग्रहण; 'या' राशींना होणार फायदा

‘या’ दिवशी वर्षातले पहिले चंद्रग्रहण; ‘या’ राशींना होणार फायदा

Subscribe

ज्योतिष शास्त्रात ग्रहणाला विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. वर्षातील पहिले चंद्रग्रहण 25 मार्च 2024 रोजी असणार आहे. ज्योतिष शास्त्रात ही घटना खूप महत्त्वाची मानली जाते. परंतु हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे त्याचा सुतक काळ देखील अमान्य असेल.

परंतु ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहण भारतात दिसणार नसले तरी ग्रहणाचा प्रभाव सर्व राशींवर काही प्रमाणात पाहायला मिळेल. ग्रहण काळात नकारात्मक शक्तींचे वर्चस्व सुरु होते. त्यामुळे या काळात जास्तीत जास्त देवाच्या नावाचा जप करण्याचा सल्ला दिला जातो.

- Advertisement -
चंद्रग्रहण वेळ

चंद्रग्रहण सोमवार, 25 मार्च रोजी सकाळी 10.24 वाजता सुरू होईल, तर दुपारी 03.01 वाजता समाप्त होईल.

चंद्रग्रहणाचा ‘या’ राशींना होणार फायदा

Horoscope Prediction Guide 2024, According to Your Zodiac Sign

- Advertisement -
  • मेष

चंद्रग्रहणाचा प्रभाव मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप शुभ परिणाम देणारा ठरेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. जोडीदारासोबतचे नाते मजबूत होईल.

  • कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी देखील ग्रहण शुभ ठरेल. या काळात तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळू शकते. गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल.

  • कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी देखील चंद्रग्रहण भाग्यकारक ठरेल. या काळात नवीन नोकरी मिळू शकते. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहिल.

 


हेही वाचा : 

हातात पैसा टिकत नाही? ‘या’ उपायांनी होईल चमत्कार

- Advertisment -

Manini