Thursday, April 18, 2024
घरमानिनीReligiousहातात पैसा टिकत नाही? 'या' उपायांनी होईल चमत्कार

हातात पैसा टिकत नाही? ‘या’ उपायांनी होईल चमत्कार

Subscribe

खूप मेहनत केली, कितीही पैसा कमावला तरी सामान्य माणसाला सतत आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु होताच अनेकांचा खिसा रिकामी होतो. परंतु हातात पैसा का टिकत नाही, याचे खरं कारण तुम्हाला माहित आहे का? यामागे ज्योतिष शास्त्रासोबतच वास्तू शास्त्राचा देखील सहभाग आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, पाहायला गेलं तर व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहांच्या अशुभ स्थितीमुळे भाग्य कमजोर होते. अशावेळी देखील आर्थिक समस्या उद्भवतात. तसेच वास्तू शास्त्रानुसार पाहायला गेलं तर घराची दिशा, पैसे ठेवण्याची दिशा चुकीची असल्याने देखील या समस्या उद्भवतात. अशावेळी काही उपाय करु शकता.

पैसे बचत करण्यासाठी काय करावे?

Infuse sweet and sour flavours of India in this Indore home - Architect and  Interiors India

- Advertisement -

 

  • नेहमी आपले घर आणि घराचा प्रवेशद्वार स्वच्छ आणि सुंदर ठेवावा, देवी लक्ष्मी अशा ठिकाणी आनंदाने वास करतात. तसेच स्वयंपाक घर देखील स्वच्छ ठेवावे. यामुळे घरात पैशांची कमतरता भासत नाही.
  • रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाक घरात उष्टी भांडी ठेवू नका. रात्रभर स्वयंपाकघरात उष्टी भांडी ठेवल्यास घरात आर्थिक, आरोग्य समस्या उद्भवतात.
  • दररोज घरात देवाची आराधना करा, देवाच्या स्तोत्र, मंत्राचा जप करा.

Shot of multiple denominations of Indian rupees. Close up Indian Money. New Indian  currency notes. 10, 20, 50, 100, 200, 500, 200 Indian Rupee notes. paying  in cash. Stock Photo | Adobe Stock

- Advertisement -
  • नियमित घरातील तुळशीची पूजा करा, संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावा.
  • घराच्या नैऋत्येला पैशांचे कपाट, तिजोरी ठेवा. यामुळे पैसा टिकतो. तसेच तिजोरीचे तोंड उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे उघडणारे असावे.
  • पिवळ्या कपड्यात हळद बांधून स्वयंपाकघरात ठेवा आणि शनिवारी गरीबांना पैसे दान करा.

हेही वाचा :

पूजेमध्ये धूप, अगरबत्ती लावण्यामागे धार्मिक महत्व काय?

- Advertisment -

Manini