घरदेश-विदेशRahul Gandhi : देशात भीतीचे वातावरण; राहुल गांधींचा भाजपावर निशाणा

Rahul Gandhi : देशात भीतीचे वातावरण; राहुल गांधींचा भाजपावर निशाणा

Subscribe

उत्तर प्रदेश दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज चौथ्यांदा बाबा विश्वनाथ यांच्या दरबारात हजेरी लावली आणि नतमस्तक झाले. भारत जोडो न्याय यात्रेचा प्रवास सुरू होऊन 35 दिवस झाले आहेत. वाराणसीत पोहोचलेल्या राहुल गांधींनी जनतेला संबोधित करताना भाजप सरकार आणि पंतप्रधान मोदींवरही जोरदार हल्ला चढवला.

वाराणसी : काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या उत्तर प्रदेशातून मार्गक्रम करीत आहे. त्यांच्या उत्तर प्रदेश दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. आज आपल्या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघ वाराणसी येथे पोहोचले. यावेळी राहुल गांधी यांनी देशात भीतीचे वातावरण असून, जी स्थिती आहे ती दाखवली पाहीजे असेही आवाहन प्रसार माध्यमांना त्यांनी यावेळी केले. (Rahul Gandhi Climate of fear in the country Rahul Gandhi targets BJP)

उत्तर प्रदेश दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज चौथ्यांदा बाबा विश्वनाथ यांच्या दरबारात हजेरी लावली आणि नतमस्तक झाले. भारत जोडो न्याय यात्रेचा प्रवास सुरू होऊन 35 दिवस झाले आहेत. वाराणसीत पोहोचलेल्या राहुल गांधींनी जनतेला संबोधित करताना भाजप सरकार आणि पंतप्रधान मोदींवरही जोरदार हल्ला चढवला.

- Advertisement -

वाराणसीतील जनतेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, देशात द्वेषाचे वातावरण आहे. हा देश द्वेषाचा देश नाही. भारत जोडो यात्रेत मी कन्याकुमारी ते काश्मीर चाललो होतो. माझ्या प्रवासात मला हजारो लोक भेटले. देशात भीतीचे वातावरण आहे असाच अनूभव त्यंनी सांगितल्याचेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

हेही वाचा : CM Eknath Shinde : वारसा सांगण्याआधी आरसा पाहा; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

- Advertisement -

पुढे बोलताना खासदार राहुल गांधी म्हणाले की, यात्रेत भाजप आणि आरएसएसचे लोकही आले होते. आमच्याकडे येताच ते आमच्याशी छान बोलले. जेव्हा आपण एकत्र काम करतो तेव्हाच हा देश मजबूत होतो. देशाला एकत्र आणणे हीच खरी देशभक्ती आहे. पुढे खासदार राहुल गांधी म्हणाले की, सध्या देशात द्वेष आणि भीतीचे वातावरण आहे. यावेळी राहुल गांधी यांनी प्रसार माध्यमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मीडियाला अदानी, अंबानी आणि मोदींचा माणूस म्हटले जाते. नोटाबंदी आणि जीएसटीच्या उणिवा कोणीही दाखवत नाही. अशा शब्दांत गांधी यांनी प्रसार माध्यमांचा समाचार घेतला.

हेही वाचा : Eknath Shinde : “एक दिवस तुम्ही कचऱ्यात जाणार…” शिंदेंचा ठाकरेंवर घणाघाती हल्ला

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी शेतकरी आणि मजुरांची भेट घेतली असता त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. देशात अब्जाधीश आणि गरीब समान कर भरतात. त्यामुळे भारत जोडो यात्रेत न्याय हा शब्द जोडण्यात आला. यानंतर राहुल यांचा ताफा चर्चमार्गे मांडूवाडीहच्या दिशेने रवाना झाला. चांदपूर, लोहटा मार्गे ही यात्रा पुढे जाणार आहे. यावेळी राहुल लोहटा येथील विणकरांशी बोलण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -