घरक्राइमSameer Wankhede : 25 कोटी लाच प्रकरणी नवा ट्विस्ट; CBI शाहरुख, आर्यन...

Sameer Wankhede : 25 कोटी लाच प्रकरणी नवा ट्विस्ट; CBI शाहरुख, आर्यन खानची करणार चौकशी

Subscribe

Sameer Wankhede : मुंबई : मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणात आर्यन खानला (Aryan Khan) सोडण्यासाठी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) चे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची चौकशीही करत आहेत. मात्र आता लाच प्रकरणी शाहरुख खान (Shah Rukh Khan)आणि त्याचा मुलगा आर्यन खान यांचे देखील जवाब नोंदवण्यात येणार आहेत. (Sameer Wankhede New twist in 25 crore bribe case CBI will interrogate Shah Rukh Aryan Khan)

एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगितले की, “आम्ही लवकरच एनसीबीने अटक केलेल्या आर्यन खान आणि शाहरुख खान यांचे जबाब नोंदवू, ज्यांच्याकडून आरोपी किरण गोसावी आणि सानविल डिसोझा यांनी वानखेडेच्या सांगण्यावरून 25 कोटी रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्यासाठी त्यांचे जबाब नोंदवणे आवश्यक आहे. त्यामुळे क्रूझ ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतरही आर्यन खान अन् अभिनेता शाहरुख खान यांचा जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला रोखण्यासाठी ईडीकडून धाडसत्र – खासदार संजय राऊत

एजन्सीने मे महिन्यात समीर वानखेडेची चौकशी केली आहे, परंतु त्याच्याशी औपचारिकपणे चौकशी करण्यासाठी न्यायालयाच्या परवानगीची प्रतीक्षा करत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुंबई उच्च न्यायालयाने वानखेडे यांना 23 जूनपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे.

- Advertisement -

गेल्याकाही दिवसांपासून समीर वानखेडे लाच प्रकरणाच्या चौकशीला वेग आला आहे. एनसीबीच्या समीर वानखेडे व्यतिरिक्त बऱ्याच लोकांचे जबाब याप्रकरणी नोंदवले आहे. त्यातच आता समीर वानखेडे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी खरचं आर्यन खानला सोडण्यासाठी खंडणी मागितली होती की नाही? या प्रकरणाबद्दल शाहरुख आणि आर्यन खान यांचे काय जबाब असतील यावर या प्रकरणाचं भवितव्य अवलंबून असल्याचे आता बोलले जात आहे.

हेही वाचा – Ashadhi Vari 2023 : वारकऱ्यांना राज्य सरकारतर्फे मिळणार विमा संरक्षण; एकनाथ शिंदेंची घोषणा

वानखेंडेंविरोधात प्रथमदर्शनी पुरावे असल्याचा सीबीआयचा दावा

भ्रष्टाचार, गुन्हेगारी कारस्थान व धमक्यांद्वारे खंडणीचा प्रयत्न, असे वानखेडे व अन्य काहींवर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांबाबत प्रथमदर्शनी पुरावेही आहेत. या प्रकरणाचा तपास प्राथमिक टप्प्यावर असून तो पूर्णपणे निष्पक्ष पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे वानखेडेंना दिलेले अंतरिम संरक्षण मागे घ्यावे’, असे CBI ने आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. वानखेडे यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदवण्यापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 17ए अंतर्गत चौकशीसाठी मंजुरी घेण्यात आली होती. त्यामुळे  सध्याची कारवाई ही कायद्याच्या चौकटीत आहे, असा दावाही CBI ने प्रतिज्ञापत्रात केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -