सामान्य वाटणारा खोकला ठरू शकतो फुफ्फुसांच्या कॅन्सरचं करणं; ‘ही’ आहेत लक्षणं

सामान्य वाटणारा खोकला ठरू शकतो फुफ्फुसांच्या कॅन्सरचं करणं; ‘ही’ आहेत लक्षणं

गेल्या काही वर्षांमध्ये अनेक आजारांनी डोकं वर काढलं आहे. अशातच मागील काही काळापासून फुफ्फुसांच्या कॅन्सरचं प्रमाण सुद्धा वाढत आहे. फुफ्फुसांचा कर्करोग झालेलया रुग्णांमध्येही वाढ होत आहे आणि विशेष म्हणजे ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये फुफ्फुसांच्या कर्करोगाचं प्रमाण वाढत आहे. सर्व प्रकारच्या कर्करोगामध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचे भारतातील(india) प्रमाण ६.९ टक्के आहे. साधारणपणे फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या आजाराचे रुग्ण सुद्धा वाढत आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये भारतात सुद्धा हा आजार वेगाने पसरत आहे. पण एकूणच या आजाराकडे बघता नागरिकनांमध्ये या आजारासंबंधी खूपच कमी माहिती उपलब्ध असते. किंवा काही वेळा त्यांना योग्य ते मार्गदर्शन सुद्धा मिळत नाही. फुफ्फुसांचा कर्करोग जोपर्यंत पूर्णपणे शरीरात पसरतनाही तोपर्यंत त्याची लक्षणं सुद्धा दिसत नाहीत. असं काहीवेळा घडतं. अशावेळी जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे व्यसन करत असाल तर ते करणे थांबावे पाहिजे. फुफ्फुसांच्या कर्करोगासंबंधी जर का तुम्हाला वारंवार खोकला होत असेल तर,(normal cough can be a sign of lung cancer) खोकला बरा होत नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तातडीने डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो उपचार करा.

हे ही वाचा – दुर्मीळ, चविष्ट आणि हेल्दी पावसाळी रानभाज्या

जर का खोकल्याचा त्रास होत असेल तर तो ही फुफ्फुसांच्या कर्करोगाचा एक संकेत असू शकतो. फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या बाबतीतही सततचा खोकला होणं हे कर्करोगाचे प्रमुख कारण असू शकते. जेव्हा खोकला कोणत्याही किरकोळ कारणांमुळे होतो तेव्हा तो काही दिवसांनी बरा होतो. पण खोकला बराच काळ झाला तरीही बारा होत नसेल तर तो गंभीर आजाराचा धोका असू शकतो.  जेव्हा खोकला काही आठवडे किंवा काही महिने टिकतो तेव्हा ते फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे असू शकते.(normal cough can be a sign of lung cancer)

हे ही वाचा – नाश्ता किंवा लंच ऐवजी ‘ब्रंच’ करण्याचा नवा ऑप्शन किती फायदेशीर ? जाणून घ्या

काय आहेत लक्षणं

१- सततचा खोकला, खोकल्यासोबतच रक्त सुद्दा पडणे

२- श्वास घेण्यास त्रास होणे

३- छातीत दुखणे

४- हा खोकला फुफ्फुसातील कर्करोगाच्या पेशींमध्ये वाढ करतो

५- खोकताना किंवा बोलताना घासा दुखणे

हे ही वाचा – चिंचेच्या पानांचा चहा कधी प्यायला आहे का ? ‘हे’ आहेत फायदे

 

 

 

First Published on: August 1, 2022 2:27 PM
Exit mobile version