उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा यासाठी अनेकजण आईस्क्रिम खातात किंवा कोल्ड्रिंग्स पितात. परंतु गुलकंद हा असा पदार्थ आहे ज्याचे सेवन केल्याने शरीराला खूप फायदा होता. गुलकंदमध्ये व्हिटामिन-सी, ई आणि बी भरपूर प्रमाणात असते. याच्या सेवनाने शरीर थंड राहते तसेच उन्हाळ्यामुळे होणारा त्रास देखील याच्या सेवनाने दूर होतो. त्यामुळे उन्हाळ्यात कुल राहण्यासाठी गुलकंदचे दररोज सेवन करा.
गुलकंद खाण्याचे फायदे
- गुलकंदात गुलाबाबरोबरच, साखरही असल्याने शरीराला व्हिटॅमिन सी व व्हिटॅमिन ई चा पुरवठा होतो.
- गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार केला जाणारा गुलकंद जितका चविष्ट असतो तितकाच तो आरोग्यासाठीही फायदेशीर असतो.
- जेवणानंतर गुलकंद खाल्ल्यास पचनक्रिया उत्तम होण्यास मदत होते.
- तसेच उन्हाळ्यात उद्भवणारे पचनाचे विकार दूर ठेवण्यास मदत होते.
- साखर आणि गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार होणारा गुलकंद शरीरात थंडावा निर्माण करून वाढत्या उकाड्यामुळे शरीरातील दाह कमी होतो.
- गुलकंद हे उन्हाळ्यात ऊर्जा देणारे एक उत्तम टॉनिक आहे. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि थकवा दूर होतो.
- दररोज गुलकंदचे सेवन केल्याने गॅस, अॅसिडिटी पासूनन बचाव होतो.
- गुलकंदामुळे अल्सरची समस्या देखील दूर होते तसेच श्वासाच्या गुर्गंधीपासूनही आराम मिळतो.
- गुलकंद शरीराला डिटॉक्स करुन शरीराला गंभीर आजार होण्यापासून वाचवते.
- गुलकंद खाल्ल्याने डोळे निरोगी आणि ताजे राहतात. याचे नियमित सेवन केल्याने मोतीबिंदूपासून बचाव होतो.
हेही वाचा :