घरमनोरंजनIndrani Mukherjee Web Series : द इंद्राणी मुखर्जी सीरिजचं प्रदर्शन थांबवलं; मुंबई...

Indrani Mukherjee Web Series : द इंद्राणी मुखर्जी सीरिजचं प्रदर्शन थांबवलं; मुंबई हायकोर्टाचा दणका

Subscribe

मुंबई उच्च न्यायालयाने ओटीटी प्लॅटफॉर्म Netflix ला इंद्राणी मुखर्जीवरील वेब सिरीजचे प्रदर्शन थांबविण्यास सांगितले आहे. ही वेब सिरीज शुक्रवारी 23 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार होती. सध्या मुंबई उच्च न्यायालयाने ते थांबविण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई : शीना बोरा हत्या प्रकरण आजही चर्चेत आहे. स्वतःच्या मुलीच्या हत्येप्रकरणी आई इंद्राणी मुखर्जीला तुरुंगात जावे लागले होते. ‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी: बरीड ट्रुथ’ या वेब सीरीजमध्ये लोकांना या प्रकरणाची सर्व माहिती मिळणार आहे. मात्र या वेब सीरिजबाबत एक मोठं वृत्त समोर आलं आहे. ते म्हणजे मुंबई उच्च न्यायालयान या वेब सीरिजचं प्रदर्शन थांबवलं आहे. (Indrani Mukherjee Web Series The Indrani Mukherjee Series Stopped Bombay High Court)

मुंबई उच्च न्यायालयाने ओटीटी प्लॅटफॉर्म Netflix ला इंद्राणी मुखर्जीवरील वेब सिरीजचे प्रदर्शन थांबविण्यास सांगितले आहे. ही वेब सिरीज शुक्रवारी 23 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार होती. सध्या मुंबई उच्च न्यायालयाने ते थांबविण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : Maratha Reservation : बारसकर महाराजांनंतर आंदोलक संगीता वानखेंडेंचा जरांगेंवर आरोप

सीबीआयने घेतला होता आक्षेप

तपास यंत्रणा सीबीआयने इंद्राणी मुखर्जीवरील वेब सीरिजच्या प्रदर्शनावर आक्षेप घेतला होता. या सीरिजमुळे या प्रकरणाचा तपास, त्याचा निकाल आणि समाजमनावर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत सीबीआयकडे याबाबतची सर्व माहिती असायला हवी असा म्हणून सीबीआयने आक्षेप घेतला होता.

- Advertisement -

हेही वाचा : Rohit Pawar : कांदा निर्यात बंद ते महानंद; रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

पुढील सुनावणी 29 फेब्रुवारी रोजी

इंद्राणी मुखर्जीवरील वेब सीरिज प्रकरणाची पुढील सुनावणी 29 फेब्रुवारी रोजी होणार आहे. याशिवाय नेटफ्लिक्सला सीबीआय अधिकाऱ्यांसाठी विशेष स्क्रीनिंगची व्यवस्था करण्यासही सांगण्यात आले आहे.
इंद्राणी मुखर्जी आणि शीना बोरा हे सर्वाधिक गाजलेले प्रकरण आहे. या प्रकरणाची कथा कोणत्याही बॉलिवूड चित्रपटाच्या क्राइम, सस्पेन्स आणि थ्रिलर कथेला मात देऊ शकते. ‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी: बरीड ट्रुथ’ या वेबसिरीजचे अनेक पैलू लोकांसमोर आणण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. त्या सीरिजच्या प्रदर्शनावर बंदी आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -