Thursday, April 18, 2024
घरमानिनीHealthलवंगाचा चहा पिरीएड्स क्रॅम्प्ससाठी फायदेशीर

लवंगाचा चहा पिरीएड्स क्रॅम्प्ससाठी फायदेशीर

Subscribe

पिरीएड्समध्ये महिलांना पोटात दुखणे, पाठ दुखणे, क्रॅम्पस सारख्या समस्या जाणवतात. या समस्यापासून आराम मिळण्यासाठी अनेक महिला पेन किलर सुद्धा घेतात. पण, तंज्ञाच्या मते, हे योग्य नाही. सतत पेन किलर शरीरास हानिकारक ठरू शकते. तुमची हीच समस्या लक्षात घेत आज आम्ही तुम्हाला अशा एका चहाबद्दल सांगणार आहोत जो पायल्याने तुम्हाला पिरीएड्स क्रॅम्प्सपासून आराम मिळेल. पिरीएड्स क्रॅम्प्स पासून आराम मिळण्यासाठी तुम्हाला लवंगाचा चहा उपयुक्त ठरतो. लवंग अनेकदा दातदुखी, पाचन समस्येसाठी आणि पिरीएड्स क्रॅम्पसाठी वापरली जाते.

पिरीएड्स क्रॅम्प्ससाठी लवंगाचे फायदे –

- Advertisement -

अनेक महिलांना पिरीएड्सच्या दिवसतात पोटात दुखणे, पाठ दुखणे, ओटीपोटात वेदना होणे यासारख्या समस्या प्रामुख्याने जाणवतात. काही मुलींना किंवा स्त्रियांना पिरीएड्समध्ये इतक्या वेदना होतात की त्यांना दैनंदिन कामे करण्यासही त्रास होतो. अशावेळी महिला समस्यांपासून आराम मिळण्यासाठी घरगुती उपाय शोधू लागतात. अशा परिस्थितीत तुम्हाला लवंगाचा चहा फायद्याचा ठरेल. लवंगाचे सेवन सर्वोत्तम नॅचरल पेनकिलर असू शकते, कारण यात युजेनॉल असते. जे वेदना वाढविणारे एन्झाइम्स प्रतिबंधित करतात.

- Advertisement -

तज्ज्ञांच्या मते, लवंगाचा वापर गर्भाशयाचे आकुंचन कमी करण्यासाठी वर्षानुवर्षे केला जाते आहे. शिवाय पिरीएड्स क्रॅम्प्ससाठी देखील केला जातो. लवंगातील अँटी एम्फलिमेंटरी गुणधर्म वेदनादायक प्रोस्टाग्लॅडिनचे उत्पादन करतात. याव्यतिरिक्त लवंगामुळे रक्ताभिसरण वाढते आणि जेव्हा वेदनादायी भागात रक्तप्रवाह वाढतो तेव्हा तुम्हाला वेदना आणि पेटके यापासून आराम मिळतो.

लवंगाचा चहा कसा बनवाल?

साहित्य –

लवंग – २ ते ३
पाणी – एक ग्लास

कृती –

भांड्यामध्ये एक ग्लास पाणी घ्या.
पाण्यात २ ते ३ लवंगा टाका.
पाणी अर्धे होईपर्यत लवंग त्यात उकळू द्या.
तयार चहा प्या.

लवंग हे नॅचरल पेनकिलर, अँटी बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सीडेन्ट आहे. याव्यतिरिक्त त्यात आवश्यक पोषक, बायोक्टिव संयुगे असतात. तसेच लवंगात जीवनसत्वे, खनिजे जसे की व्हिटॅमिन सी, के, मॅगनीज आणि फायबर असतात.

 

 

 


हेही वाचा : एब्सेंट पिरियड्स म्हणजे काय?

 

- Advertisment -

Manini