Saturday, April 27, 2024
घरमानिनीHealthआंबट-गोड कैरी खाण्याचे जबरदस्त फायदे

आंबट-गोड कैरी खाण्याचे जबरदस्त फायदे

Subscribe

कैरी म्हटलं की लगेच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. कैरीपासून आपण कैरीची चटणी, लोणचे, पन्हे असे अनेक प्रकार बनवतो. उन्हाळ्याच्या दिवसात या आंबट आणि गोड कैरीचे सेवन करण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

कैरी खाण्याचे फायदे

The most awaited fruit of the season- Mangoes! – Shreyasee Shinde

- Advertisement -
  • उन्हाळ्यात अचानक बदलणाऱ्या वातावरणामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढणे फार गरजेचे असते. कैरीत भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते. ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते आहे.
  • ज्यांना अॅसिडिटी, बद्धकोष्ठता आणि अपचनचा त्रास आहे त्यांनी कैरीचे सेवन करणे फायदेशीर असते.
  • बद्धकोष्ठता आणि पोट्याच्या सर्व तक्रारी आणि विकारांवर कैरी उपायकारक असते.
  • कैरी खाल्ल्यामुळे दात मजबूत होतात. तसेच तोंडातून दुर्गंध येण्याची समस्या दूर होते.
  • मधुमेह असलेल्या व्यक्तींनी कैरीचे सेवन केल्याने आपल्या शरीरामधील साखरेच्या पातळीला कमी करण्यास मदत होते.

Raw Mango Korom

  • कैरीचे सेवन करणे डोळ्यांसाठी सुद्धा फायदेशीर असते.
  • कैरी नियमित खाल्ल्याने आपले केस काळेभोर राहतात आणि आपली त्वचा तजेलदार आणि मऊ होऊन त्वचा टवटवीत राहते.
  • कैरीमुळे आपल्या शरीरामधील लोह पुरवठा पूर्ण करू शकता.
  • जर तुम्हाला जास्त घाम येत असेल तर कैरीचे पन्हे किंवा कैरी खा. यामुळे या त्रासापासून आराम मिळतो.
  • रक्तविकार टाळण्यासाठी कैरीचे सेवन केले पाहिजे.

हेही वाचा :

Summer Drink : उन्हाळ्यात सब्जा खाण्याचे गुणकारी फायदे

- Advertisment -

Manini