Tuesday, April 9, 2024
घरमानिनीHealthSummer Drink : उन्हाळ्यात सब्जा खाण्याचे गुणकारी फायदे

Summer Drink : उन्हाळ्यात सब्जा खाण्याचे गुणकारी फायदे

Subscribe

सध्या सर्वत्र उन्हाची काहिली जाणवत आहे. उष्णतेमुळे सर्वांनाचं आरोग्याच्या समस्या उद्धभवतात. उन्हामुळे उष्माघाताचा त्रास, उन्हाळे लागणे, अंगाववर घामोळे येणे, उष्णतेचे चट्टे अंगावर उठणे अशा अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात.पण या सर्व समस्यांवर काही घरगुती उपचार करता येतात.उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी सतत पाणी पिणे, सतत तोंड आणि हात-पाय धुणे अशा अनेक उपाय करता येतात.याशिवाय घरातच अशा अनेक गोष्टी असतात ज्यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.सब्जा हे शरीरासाठी अत्यंत गुणकारी असतं. यामध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेंटरी गुण असतात जे त्वचेची रक्षा करतात.

सब्जामध्ये ओमेगा -3 , फॅटी अॅसिड्स, फायबर, प्रोटीन आणि सर्व आवश्यक अमिनो अॅसिड असतात. उन्हाळ्यात तर आहारात जास्तीत-जास्त सब्जाचा समावेश केला पाहिजे. कारण सब्जाचे सेवन केल्याने आपले शरीर थंड राहण्यास मदत होते. सब्जाच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, ओमेगा-3 फॅटी अॅसिडस् आणि मॅग्नेशियम असतात.

- Advertisement -

सब्जा चे फायदे (Sabja Seeds Benefits)
मूत्र विसर्जन करताना उष्णतेमुळे होणारा दाह कमी होतो.
युरिन इनफेक्शन झाल्यास सब्जाचे बी पाण्यातून घेण्याचा सल्ला दिला जातो.
एखाद्या विकारावर घेतलेल्या औषधांमुळे होणारी जळजळ कमी होते.
मधूमेहींची रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.
पोट स्वच्छ झाल्याने अपचन,बद्धकोष्ठता आणि गॅसचा त्रास कमी होतो.
सब्जामध्ये भरपूर प्रथिने, लोह ,फायबर भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहते.
सब्जा बीयांचा त्वचा आणि केसांवरदेखील चांगला परिणाम होतो.हे. त्याचे सेवन केल्याने पोट भरते आणि भूक देखील नियंत्रणात राहते.

सब्जाचे बी कसे सेवन करावे (How To Eat Sabja)
एका भांड्यामध्ये दोन चमचे सब्जा बी घ्या आणि त्यामध्ये या बीया भिजतील ऐवढे पाणी घाला. पंधरा ते वीस मिनीटांनी बीयांचा आकार फुगून दुप्पट होईल. तुम्ही या बीया पाणी, लिंबूपाणी, मॅंगोशेक,फालुदा, मिल्कशेक, दही अथवा सलाडसोबत तुम्ही खाऊ शकता. शिवाय उन्हाळ्यात घराबाहेर जाताना नेहमी पाण्याच्या बाटलीमध्ये सब्जाचे पाणी अथवा सरबतसोबत ठेवा. ज्यामुळे तुम्हाला उष्माघाताचा त्रास होणार नाही.

- Advertisement -

सब्जाचे बी कोणी सेवन करू नये (Who Should Not Eat Sabja)
लहान मुले आणि गर्भवती महिलांनी सब्जाचे बी सेवन करू नये. कारण सब्जाचे बी सेवन केल्यामुळे गर्भवती महिलांची ऐस्ट्रोजन या हॉर्मोन्सची पातळी कमी होते. जे गर्भाच्या वाढीसाठी मुळीच योग्य नाही. शिवाय सब्जाचे बी थंड गुणधर्माचे असल्यामुळे ते लहान मुलांनादेखील खाण्यास देऊ नये.

- Advertisment -

Manini