सूर्यनमस्कार 12 योगासनांची सांगड घालून केला जातो. 12 मुद्रांनी बनलेले सूर्यनमस्कार क्रमवार पद्धतीने केले जातात. यामध्ये वापरली जाणारी 7 आसने शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवतात. सूर्यनमस्कारात केल्या जाणाऱ्या प्रत्येक आसनाचे स्वतःचे असे महत्व आहे. सूर्यनमस्कार करणाऱ्यांचे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य उत्तम राहते. त्याचबरोबर शरीरातील रक्ताभिसरणही सुधारते. सूर्यनमस्काराच्या माध्यमातून तुम्ही तुमचा स्ट्रेस कमी करू शकता आणि शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करता.
सूर्यनमस्काराचे फायदे –
शरीराची लवचिकता वाढते – दररोज सूर्यनमस्काराची मुद्रा केल्यास शरीरात वाढणाऱ्या कडकपणापासून आराम मिळतो. पाठ, मान आणि कंबरमध्ये वाढणारी वेदना कमी करण्यासाठी नियमितपणे सूर्यनमस्कार करावेत.
मेटॅबॉलिझम सुधारते – योगासनांचा सर्व केल्याने पोटाचे स्नायू बळकट होतात. यामुळे शरीर निरोगी रहाते. यासोबतच अपचन, सूज येणे, ऍसिडिटी आणि पोटदुखीसारख्या समस्या दूर होतात.
मेंटल स्ट्रेंथ – सूर्यनमस्कार नियमित केल्याने मानसिक आरोग्य सुधारते. यामुळे मानसिक ताण दूर होऊन झोप न लागण्याची समस्या दूर होऊ शकते. याशिवाय हॅपी हार्मोन्स बाहेर पडतात.
वजन कमी होते – सूर्यनमस्कार शरीरातील वाढलेले वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. सूर्यनमस्काराच्या सरावाने अतिरिक्त कॅलरी जमा होण्याची समस्या टाळता येऊ शकते आणि तुमचे स्नायूही मजबत होतात.
एनर्जी वाढते – सूर्यनमस्कार केल्याने शरीराला व्हिटॅमिन-डी मिळते. रोज याचा सर्व केल्याने शरीरातील एनर्जी लेव्हल वाढू शकते आणि शरीरातील स्टॅमिना वाढू लागतो. परिणामी, काम करण्याची क्षमताही वाढते.
निद्रानाशेपासून मुक्ती – सूर्यनमस्कराचा नियमित सर्व केल्याने झोप न लागण्याची अर्थात निद्रानाशेची समस्या दूर होते. परिणामी, दिवसेंदिवस वाढत जाणारा ताण कमी होतो आणि मेंदूला शांती मिळते.
हाडे मजबूत होतात – जे लोक दररोज सूर्यनमस्कार करतात, त्यांच्या शरीरातील व्हिटॅमिन-डी ची कमतरता दूर होते. यामुळे हाडे दुखण्याची आणि क्रॅम्पसची समस्या दूर होते.
पिरीएड्स नियमित होतात – जर एखाद्या महिलेला अनियमित पिरीएड्सची तक्रार असेल तर सुर्यनमस्कारची आसने केल्याने समस्या दूर होते. याशिवाय ही आसने नियमित केल्याने बाळंतपणातील वेदनाही कमी होतात.
हेही वाचा : jumping jacks benefits : जंपिंग जॅकचे हे आहेत फायदे