Saturday, April 27, 2024
घरमानिनीBeautyपपईचा फेसपॅक लावल्यास चेहरा होईल तजेलदार

पपईचा फेसपॅक लावल्यास चेहरा होईल तजेलदार

Subscribe

हवामान बदलले की चेहऱ्यावर अनेक बदल दिसतात. अशावेळी कधी मुरुमांची समस्या तर कधी त्वचेतला चिकटपणा जाणवतो. अशावेळी उन्हाळ्यातील हंगामी फळापासून फेस मास्क तयार करून त्वचेला हायड्रेट ठेवता येते. जेणेकरून त्वचेवर ग्लो येईल आणि त्वचाही खराब होणार नाही.

तजेलदार त्वचेसाठी टिप्स

How to do a papaya facial at home for clear and glowing skin

- Advertisement -

पपई, कॉफी आणि लिंबाचा रस

अँटिऑक्सिडेंट्सने युक्त पपई चेहऱ्याला ग्लो आणतो. व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असल्याने चेहऱ्याची त्वचा मऊ होते. यामध्ये असलेले पॅपेन एंझाइम चेहऱ्यावरील अकाली रेषा आणि सुरकुत्या दूर करण्यास मदत करते. तसेच लिंबाच्या रसामध्ये असलेले तत्व उन्हाळ्यात टॅनिंगची समस्या दूर करते. पपई, कॉफी आणि लिंबू फेस मास्क त्वचेची हरवलेली चमक परत आणण्यासाठी काम करू शकतात.

- Advertisement -

असा लावा फेसपॅक

  • फेसपॅक चेहऱ्यावर लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करा.
  • त्यानंतर एका भांड्यात पपईचा गर घ्या. त्यात एक चमचा कॉफी आणि एक चमचा लिंबाचा रस घाला.
  • हे मिश्रण चांगले मिसळा आणि जाडसर पेस्ट तयार करा.
  • आता हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा. यामुळे डेड स्किन निघून जाईल आणि त्वचा एक्सफोलिएट होईल.
  • 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर लावल्यानंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवा . यामुळे चेहऱ्यावरील चमक कायम राहील.

हेही वाचा :

फ्रेश स्किनसाठी वापरा कलिंगड फेसपॅक 

- Advertisment -

Manini