Saturday, April 27, 2024
घरमानिनीब्रश करण्याची योग्य पद्धत

ब्रश करण्याची योग्य पद्धत

Subscribe

तोंडाचे आरोग्य ज्याला इंग्रजीमध्ये ओरल हायजिन म्हटले जाते, ते निरोगी ठेवणे अत्यंत महत्वाचे असते. आपले हास्य नेहमी टिकवून राहण्यासाठी आपले दात स्वच्छ असणे आवश्यक असतात. यामध्ये टूथब्रश महत्वाची भूमिका निभावते. टूथब्रश दातांना स्वच्छ करतात आणि दातांवर जमा झालेली घाण काढून टाकतात. यामुळे दातांचे आरोग्य राखण्यासाठी योग्य टूथब्रश आणि ब्रश करण्याची योग्य पद्धत माहित असायला हवी.

योग्य टूथब्रशची निवड – सॉफ्ट ब्रिसल्स असलेला टूथब्रश निवडा. तो तुमच्या संवेदनशील दातांसाठी योग्य असतो. ब्रश निवडताना असा निवडा ज्याचे डोके लहान असेल कारण डोके लहान असलेला ब्रश तुमच्या तोंडाच्या सर्व भागात पोहचू शकेल. अशाने तोंडातील सर्व दातांची सफाई होईल.

- Advertisement -

फ्लोराईड टूथपेस्ट – फ्लोराईड टूथपेस्ट दात किडणे टाळण्यास आणि दात मजबूत करण्यास मदत करते. तथापि, टूथपेस्ट व्यतिरिक्त आपण कसे ब्रश करतो हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. म्हणजेच टूथपेस्ट कोणतही असो, योग्यप्रकारे ब्रश केल्यास त्याचा तुमच्या दातांना अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो.

- Advertisement -

ब्रशची पोझिशन – ब्रशला 45 अंश कोनात गम लाईनवर फिरवा. हा कोन दात ज्या ठिकाणी हिरड्याना टच होतात तिथपर्यत जाण्यास मदत करतो. दातांचा पुढचा, मागचा आणि च्युईंग सर्फेस स्वच्छ करण्यासाठी हलक्या गोलाकार हालचाली करत ब्रश करा. याशिवाय जोरजोरात ब्रश करू नका. अशाने हिरड्यांना त्रास होऊ शकतो.

योग्य टेक्निक महत्वाची – हलक्या गोलाकार हालचालींद्वारे तोंडाचा भाग स्वच्छ करणे आवश्यक असते. मागील दातांसह प्रत्येक दात स्वतंत्रपणे घासला जातोय का नाही ते पहा. दातांसोबत हिरड्यांकडेही लक्ष द्या. ब्रश केल्यानंतर तोंड स्वच्छ धुवा. यासाठी तुम्ही माऊथ वॉशचाही वापर करू शकता.

फ्लॉस करा – केवळ दात स्वच्छ केल्याने दातांमधील अन्नाचे सर्व कण आणि प्लेक काढता येत नाही. हे कण काढून टाकण्यासाठी तुमची फ्लॉसची मदत घेऊ शकता.

टूथब्रश बदला – तुमचा टूथब्रश दर 3 ते 4 महिन्यांनी बदला. जीर्ण झालेला टूथब्रश दात चांगल्या आणि योग्य पद्धतीने साफ करू शकणार नाही.

 

 

 


हेही वाचा : Soap Invention : साबणाचा शोध कोणी व कधी लावला?

- Advertisment -

Manini