Thursday, May 2, 2024
घरमानिनीHealth Tips : शरीरासाठी 'हे' ५ पदार्थ म्हणजे slow poison

Health Tips : शरीरासाठी ‘हे’ ५ पदार्थ म्हणजे slow poison

Subscribe

शरीराला अपायकारक पदार्थ खाऊ नये. यामुळे शरीराची हानी होते. तसेच अनेक आजार सहज उद्भवतात.

आपल्या दैनंदिन जीवनशैलीत तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी आपण सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ खातो. पण असे काही पदार्थ आहेत ज्यात जास्त कॅलरीज आणि सोडियम असतात. हे पदार्थ खाण्याचा उद्देश केवळ चव बदलणे हा असला तरी रोजच्या आहारात त्यांचा समावेश केला तर ते शरीराला अपाय करतात. चला तर मग अशाच काही खाद्यपदार्थांबद्दल जाणून घेऊया जे शरीरात पोहोचल्यानंतर स्लो पॉयझनचे काम करतात.

Food Coma: Do You Feel Sleepy After Eating? - The Wellness Corner

- Advertisement -
  • व्हाईट ब्रेडचे सतत सेवन :

पांढर्‍या पिठाचा बनवलेला पांढरा ब्रेड खायला चविष्ट असतो परंतू शरीराला जास्त हानी पोहोचवतो. ब्रेडमध्ये असलेले पोटॅशियम ब्रोमेट आरोग्यासाठी हानिकारक आहे. याचे सतत सेवन केल्याने बद्धकोष्ठता, पोटदुखी, हृदयविकार आणि मधुमेहाचा त्रास होऊ शकतो.

Plain White Bread Recipe by Niru Gupta - NDTV Food

- Advertisement -
  • अतिरिक्त साखर(गोड)खाणे :

चहा, कॉफी, सरबत यातून आपण दिवसभर साखरेचे सेवन करत असतो. साखरेचे जास्त सेवन शरीरात स्लो पॉयझन म्हणून काम करते. त्यात भरपूर कॅलरीज असतात, ज्यामुळे रक्तातील साखर वाढते. त्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाणही जास्त असते, त्यामुळे लठ्ठपणा वाढतो.

Portion Of White Sugar Stock Photo - Download Image Now - Sugar - Food,  Sugar Cane, Candy - iStock

  •  अतिरिक्त मिठाचा आहारात वापर टाळणे :

मिठाच्या जास्त सेवनाने कोलेस्ट्रॉल,उच्च रक्तदाब,लठ्ठपणा आणि यकृताशी संबंधित आजार होऊ शकतात. मिठाच्या अतिसेवनामुळे ब्लड प्रेशर जास्त प्रमाणात वाढतो. तसेच शरीरात मिठाचे प्रमाण जास्त झाल्यास अनेक रोगांना सामोरे जावे लागते.

You probably eat twice the recommended salt per day. Here's how to cut back  | CBC Radio

  • मैदाचा जास्त प्रमाणत वापर :

पिठापासून बनवलेल्या वस्तू नियमितपणे खाल्ल्याने शरीराला हानी होते. ते रोज खाणे टाळा. मैदापासून बनवलेले पदार्थ पचण्यास कठीण असतात. यामुळे हे पदार्थ जर रोजच्या रोज खाल्ले तर शरीराच्या पचन शक्तीवर त्याचे वाईट परिणाम दिसून येतात.

Maida products are dangerous to health

  • फ्रोझन फूड कायम खाणे टाळा :

यामध्ये कृत्रिम रंग आणि प्रिझर्वेटिव्ह पदार्थ असतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि कर्करोग होण्याची शक्यता असते. हे पदार्थ अतिप्रमाणात आणि नियमितपणे जर सेवन केले तर त्याचे पडसाद शरीरावर दीर्घकाळ राहतात.

Frozen doesn't mean thaw and eat; dangers lurk in the freezer | Food Safety  News

 


हेही वाचा :

सावधान! शरीरात पाण्याची कमतरता असल्यास होऊ शकतात ‘या’ समस्या

- Advertisment -

Manini