घरदेश-विदेशअमित शाहांचे चीनला प्रत्युत्तर; म्हणाले, "तो काळ गेला जेव्हा...'

अमित शाहांचे चीनला प्रत्युत्तर; म्हणाले, “तो काळ गेला जेव्हा…’

Subscribe

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी अरुणाचल प्रदेशातील किबिथू येथे 'व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम' आणि विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी चीनला खडे बोल सुनावले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी अरुणाचल प्रदेशातील किबिथू येथे ‘व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम’ आणि विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी चीनला खडे बोल सुनावले. ‘आता कोणीही डोळे मोठे करून आमच्या सीमेकडे पाहू शकत नाही. सुईच्या टोकाएवढ्या जमिनीवरही कोणी अतिक्रमण करू शकत नाही. भारताच्या भूमीवर कोणीही अतिक्रमण करू शकत होते ते दिवस गेले.”, अशा शब्दात अमित शाहा यांनी चीनवर निशाणा साधलाय.

यापुढे बोलताना अमित शाहा म्हणाले की, “येताना शेकडो धबधबे पाहिले. इथे उतरताच मी पेमा खांडूला घर विकत घ्या आणि मी म्हातारा झाल्यावर इथे राहायला या असे सांगितले. भगवान परशुरामांनी अरुणाचल हे नाव दिले होते. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक मुलाला अरुणाचल हे सूर्यदेवाच्या पहिल्या किरणाच्या भूमीच्या नावाने माहीत आहे. अरुणाचल हे भारतमातेच्या मुकुटातील एक दैवी रत्न आहे.

- Advertisement -

“पूर्वी जेव्हा कोणी मध्य भारतातून यायचे तेव्हा ते भारतातील शेवटच्या गावातून आल्याचे सांगायचे, पण आता मी जाऊन माझ्या नातवाला सांगेन की मी भारतातील पहिल्या गावातून आलो आहे. हा एक वैचारिक बदल आहे. दिल्लीत बसलेल्या नेत्यांच्या हलगर्जीपणामुळे आणि चुकीच्या दृष्टिकोनामुळे हा परिसर वादग्रस्त आणि अतिरेकी बनला होता. आज वाद आणि अतिरेकी संपुष्टात येत आहेत.”, असं देखील यावेळी अमित शाहा म्हणाले.

आपले आयटीबीपी जवान आणि लष्कर आपल्या सीमेवर रात्रंदिवस काम करत असल्याने आज संपूर्ण देश आपल्या घरात शांतपणे झोपू शकतो, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. आज आपण अभिमानाने सांगू शकतो की आपल्यावर वाईट नजर टाकण्याची कोणाचीही ताकद नाही. आता हेलिकॉप्टर निघून गेल्याने अमित शहा आता कसे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मी कुठेही जात नाही. आज तुमच्या गावी थांबून जेवण करून मी उद्या दुपारी जाईन, असं देखील यावेळी अमित शाह म्हणाले.

- Advertisement -

काँग्रेसवर हल्लाबोल करताना अमित शहा म्हणाले की, सीमेवरील पायाभूत सुविधांबाबत जे काही काँग्रेस सरकारने १२ टर्मच्या काळात केले नाही त्यापेक्षा जास्त काम मोदी सरकारने २ टर्ममध्ये केले आहे. २०१४ पूर्वी संपूर्ण ईशान्य प्रदेश हा एक अशांत प्रदेश म्हणून ओळखला जात होता, परंतु गेल्या ९ वर्षात पंतप्रधान मोदींच्या धोरणामुळे ईशान्य भाग आता देशाच्या विकासात योगदान देणारा प्रदेश म्हणून ओळखला जातो.

यापूर्वी अमित शाह यांच्या अरुणाचल दौऱ्यावर चीनने आक्षेप घेतला होता. या भेटीमुळे चीनच्या प्रादेशिक सार्वभौमत्वाचे उल्लंघन होत असून त्याचा विरोध असल्याचे चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या प्रवक्त्याने म्हटले होते. अमित शाह यांनी ज्या किबिथू गावात ‘व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम’ सुरू केला आहे ते चीन सीमेपासून एक किलोमीटर अंतरावर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -