Thursday, May 16, 2024
घरमानिनीHealthबाळ आणि बाळंतिणीसाठी शेक आणि Massage का आहे गरजेचा?

बाळ आणि बाळंतिणीसाठी शेक आणि Massage का आहे गरजेचा?

Subscribe

आई होणं आणि बाळाला जन्म देणं या दोन्ही गोष्टी आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक आहे. यावेळी दोघांचे ही लाड-हट्ट पुरवले जातात. मात्र जेव्हा बाळं जन्माला येते तेव्हा त्याची आणि आईची फार काळजी घ्यावी लागते. कारण बाळ जरी आईच्या उदरातून बाहेर पडले असले तरीही तिच्या शरिरात खुप काही बदलल झालेला असतो. तसेच बाळाला काही गोष्टींची आवश्यकता असते. त्याची स्थिती अगदी नाजूक असते. त्यामुळेच बाळंतपणानंतर बाळाला आणि आईला ही मसाज केला जातो.

खरंतर बाळंतपणानंतर इंन्फेक्शन होण्याची फार शक्यता असते. त्यामुळे बाळाला आणि आईला लगेच घराबाहेर पडू दिले जात नाही. तर यामागील अजून एक कारण असे सुद्धा आहे की, पूर्वीच्या काळी असे म्हटले जायचे की बाळंतपणानंतर मुलाला आईची उब मिळावी म्हणून तिला त्याच्यासोबत ठेवले जायचे. अशातच आता दोघांसाठी मालिश ही तितकीच महत्वाची आहे.

- Advertisement -

मालिश करण्याचे फायदे काय पाहूयात-
-मालिश केल्याने अंग दुखणे किंवा पाठ दुखण्याची समस्या कमी होते
-स्ट्रेस कमी होतो
-मसल्स रिलॅक्स होतात
-महिलेच्या स्तनांना व्यवस्थितीत मालिश केल्यास दुधाच्या गाठी होत नाहीत.
-मालिश केल्याने त्वचा मऊ होते.

- Advertisement -

तर बाळंतीण महिलेला शेक का दिला जातो हे जाणून घेऊयात
बाळंतीण महिलेला शेक देण्याची पद्धत ही फार जुनी आहे. तिला शेक देण्यासाठी कोळशाची शेगडी तिच्या बेडखाली ठेवत त्यात काही आयुर्वेदिक औषधं टाकली जातात. शेक देण्यामागील मुख्य उद्देश असा असतो की, डिलिव्हरी नंतरचे टाके शेकून त्याभोवती दुखत असेल्या भागाला ही आराम मिळतो.


हेही वाचा- बाळाला मालिश का करावी?

- Advertisment -

Manini