Tuesday, April 30, 2024
घरमानिनीHealthप्रेग्नेंसीमध्ये कोल्ड ड्रिंकऐवजी कोणते पेय प्यावे?

प्रेग्नेंसीमध्ये कोल्ड ड्रिंकऐवजी कोणते पेय प्यावे?

Subscribe

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाल्याने या दिवसात गर्भवती महिलांना देखील विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे या वातावरणात स्वत:ला हाइड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करावा. प्रेग्नेंसी दरम्यान आई आणि बाळ या दोघांनी हाइड्रेट राहणे फार महत्वाचे आहे. अशातच आम्ही तुम्हाला काही असे हेल्दी ड्रिंक्स सांगणार आहोत जे उन्हाळ्यात कोल्ड ड्रिंक्स ऐवजी तुम्ही पिऊ शकता.

  • नारळाचे पाणी

6 Health Benefits of Coconut Water नारळाचे पाणी डिहाइड्रेशन पासून बचाव करण्याचा सर्वोत्तम पर्याय आहे. याचे सेवन केल्याने थकवा दूर होतो. प्रेग्नेंसीमध्ये तहान भागवण्यासाठी नारळाचे पाणी प्यावे.

- Advertisement -
  • लिंबू पाणी

How to make yummy nimbu pani or lemonade or shikanji?
लिंबू पाणी तुमच्या शरिराला हाइड्रेड ठेवते आणि विटामिन-सी ची पुर्तता करते. लिंबू पाणी तुम्ही दुपारी पिऊ शकता. जर तुम्ही मॉर्निंग सिकनेसच्या समस्येचा सामना करत असाल तर लिंबू पाण्यासह पुदीना, आलं आणि चाट मसाल्याचा वापर  करा. यामुळे मळमळ आणि उलटीपासून बचाव होईल.

  • ताज्या फळांचा ज्यूस


मोसंबी, संत्र, अननस, डाळींब अशा फळांचा ज्यूस तुम्ही पिऊ शकता. जर तुम्हाला फळं खायला आवडत नसतील तर तुम्ही हे ज्यूस पिऊ शकता. कलिंगड, टरबूजचा ज्यूस या काळात पिणे आरोग्यासाठी उत्तम मानला जातो.

- Advertisement -
  • ताक, लस्सी


उन्हाळ्यादरम्यान तुम्ही दूध, लस्सी, ताक पिऊ शकता. याव्यतिरिक्त फ्रूट स्मुदी सुद्धा पिऊ शकता.


हेही वाचा : Water Benefits : उन्हाळ्यात नेमकं किती पाणी प्यावं?

- Advertisment -

Manini