Tuesday, April 30, 2024
घरमानिनीHealthWater Benefits : उन्हाळ्यात नेमकं किती पाणी प्यावं?

Water Benefits : उन्हाळ्यात नेमकं किती पाणी प्यावं?

Subscribe

उन्हाळा सुरु झाला असून मध्य आणि पश्चिम भारतात उन्हाची तीव्रता वाढली आहे. या गरमीमुळे आपण सर्वजण हैराण होतो. उन्हाचे हे चटके आपल्याला असह्य होतात. या दिवसांमध्ये आपल्या शरीरात असलेले पाणी हे घामावाटे शरीराबाहेर पडते, तसेच इलेक्ट्रोलाइट्स प्रक्रियेमध्ये लघवी आणि लाळेच्या रुपात ही पाणी वापरले जाते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला जास्त पाण्याची आवश्यकता निर्माण होते. चांगल्या आरोग्यासाठी (good health) खूप महत्वाचे आहे. एखाद्या माणसाने दिवसभरात नक्की किती पाणी (water) प्यावे ? असा प्रश्न आपल्याला बराच वेळा पडला असेल. याचबद्दल आज जाणून घेऊयात.

किती प्रमाणात पाणी प्यावे

  • भरपूर पाणी प्यावे, असे नेहमी ऐकतो. पण भरपूर म्हणजे नेमकं किती पाणी प्यावे, ते कळत नाही. तसेच बरेच लोक एकाच वेळी दोन दोन ग्लास पाणी पितात. यामुळे ही शरीराला त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपले वय आणि वजन किती आहे, याचा विचार करून मग त्या हिशोबाने पाणी पिले पाहिजे.
  • दिवसातून किमान 7-8 ग्लास पाणी पिणे फार महत्वाचे आहे. उन्हाळ्यात, एका महिलेने दिवसातून किती पाणी प्यावे पुढे जाणून घ्या. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची पाण्याची गरज भिन्न असू शकते. निरोगी महिलांनी जवळजवळ दररोज 6 ग्लास पाणी प्यावे. तर पुरुषांनी 7-8 ग्लास पाणी प्यावे. प्रत्येकाच्या वयानुसार पाण्याची गरज वेगवेगळी असते. 15 वर्षे वय पर्यंतच्या मुलांनी साधारणपणे एक ते दोन लिटर पाणी पिले पाहिजे. प्रौढ व्यक्तींनी तीन ते चार लिटर पाणी दररोज प्यावे.
  • आपण दिवसभर कसे काम करत आहात यावर देखील शरीराला आवश्यक असलेल्या पाण्याचे प्रमाण अवलंबून असते. त्यामुळे प्रति व्यक्ती किती पाणी आवश्यक आहे हे अनेक घटकांवर अवलंबून असते आणि ते प्रत्येक व्यक्तीसाठी भिन्न असू शकते.
  • तहान लागल्यानंतर तसेच जेवताना पाणी प्यायल्याने तुम्ही पाण्याची आवश्यक मात्रा पूर्ण करू शकता. पण तुम्हाला पुरेशा प्रमाणात पाणी पिण्यासाठी मदत हवी असेल तर अधिक पाणी पिण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता.

पाणी पिण्यासाठीचे उपाय

  • ऑफीसला जा किंवा जिममध्ये, अथवा बाहेर फिरायला, कुठेही बाहेर जाताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
  • आपली दैनंदिन पाण्याची गरज भागविण्यासाठी तुम्ही साध्या पाण्याऐवजी इतर द्रव पदार्थांचे सेवन करू शकता.
  • दूध, फळांचा ताजा रस, चहा, सरबत किंवा नारळपाणी यांचे सेवन तुम्ही करू शकता.
  • सोडा अथवा इतर शर्करायुक्त पेयांमध्ये भरपूर कॅलरीज असतात. त्यामुळे शक्य तेवढे साधे पाणी पिण्याचा प्रयत्न करावा.
  • लिंबू सरबत अथवा पाण्यामध्ये इतर काही फ्लेवर्स ॲड करून तुम्ही पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याची सवय अंगिकारू शकता.
- Advertisment -

Manini