Saturday, April 27, 2024
घरमानिनीRelationshipमुलींनी वयाच्या 25 पर्यंत लग्न का करावे?

मुलींनी वयाच्या 25 पर्यंत लग्न का करावे?

Subscribe

लग्नासाठी नेमके योग्य वय काय हा प्रश्न सगळ्यांनाच भेडसावतो. याचे उत्तर तसे तर मिळणे कठीण आहे. कारण लग्न करणं अथवा न करणे ही प्रत्येकाची खासगी बाब आहे. पण आपल्याकडे लग्न करण्यापूर्वी प्रत्येकाला हल्ली व्यवस्थित सेटल व्हायचं असतं. त्यामुळे बऱ्याचदा लग्नाचं वय निघून गेलं असंही म्हटलं जाते. त्यामुळेच आपण जाणून घेऊया नक्की सर्वानुमते लग्नाचे योग्य वय काय आहे ?
आपल्या समाजात शिक्षणापासून लग्नापर्यंत मुले होण्यापर्यंतचे वय ठरलेले असते. बालपण ते पौगंडावस्थेपर्यंतचा काळ हा शिक्षण मिळविण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो, तर वयाच्या 20 वर्षांनंतरचा काळ नोकरी किंवा उदरनिर्वाहासाठी ठेवला जातो. कौटुंबिक जीवनात प्रवेश करण्यासाठी 25 वर्षांचे वय सर्वोत्तम मानले जाते आणि त्यानंतर मुले होणे, घर खरेदी करणे, पदोन्नती यासारख्या गोष्टी येतात. हे जीवनाचे चक्र आहे जे शतकानुशतके चालू आहे.

मात्र, लोकांची विचारसरणी खूप बदलली आहे. भारतातील मोठ्या शहरात शिक्षण आणि करियर याबद्दल तरुण आणि तरुणींच्या आकांक्षा वाढल्या आहेत. आता मुलींना करीयरला प्राधान्य देत स्वत:च्या पायावर उभे रहायचं आहे. त्यामुळे ते 30-35 वर्षांपर्यंत त्यांचे लग्न पुढे ढकलतात. वास्तविक, लग्नासाठी योग्य वय 25 वर्षे आहे. या वयात तरुण मुलींचे लग्न झाले तर त्या जीवनातील जबाबदाऱ्या पेलू शकतील. त्यांना योग्य वेळी कुटुंब कसे चालवायचे आणि नातेसंबंध कसे टिकवायचे हे कळेल. तज्ज्ञानुसार, लग्नासाठी मुलींचे योग्य वय हे 25 दरम्यान असायला हवे. या वयात लग्न केल्यास, तुम्हाला अनेक फायदे मिळतात. सर्वात चांगली बाब म्हणजे दोघांना एकमेकांना समजून घेण्यासाठी जास्त वेळ मिळतो. त्यामुळे करिअरसोबतच आपल्याला नात्याची विण देखील घट्ट करता येते. तसेच दोघांचेही आपल्या करिअरसाठी अनेक प्रयत्न आणि स्वप्नंही असतात. तुमच्या मुलांच्या लग्नामध्ये तुमचे वयही लपवता येईल व आरोग्यानेही तुम्ही फिट असाल. तसेच तिशीच्या आतमध्ये मुलांना जन्म देताना जास्त त्रास होत नाही.

- Advertisement -

विवाह योग्य वेळी झाला तर जीवनात स्थिरता आणि समंजसपणा येतो. कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळून व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व सुधारते. स्वावलंबन वाढते. तो अधिक शक्तिशाली आणि बुद्धिमान बनतो. मनात समाधानाची भावना निर्माण होते. वेळ वाया घालवण्याऐवजी त्याचा योग्य अर्थाने उपयोग करायला शिकतो. घरातील छोटी-मोठी कामे केल्याने आई-वडील किंवा इतरांवर अवलंबून राहण्याची भावना दूर होते. स्वत:चे जग निर्माण करून ते सजवण्याचा आनंद अनोखा असतो. हा आनंद वेळेवर अनुभवून आयुष्यात पुढे गेल्यानेच तुमचे व्यक्तिमत्त्व खरोखर सुधारते.

या वयात अजिबात लग्न करू नये
वयाच्या 13 – 18 या वयामध्ये लग्न करू नका. हे ना विज्ञानानुसार योग्य आहे ना प्रशासनानुसार. साधारण 18 वर्षानंतरच बुद्धी आणि शरीर हे दोन्ही परिपक्व होत असतं. त्यामुळे त्यानंतरच लग्नाचा विचार करणं योग्य आहे. तसंच तुम्ही जर चाळीशी पार केली असेल तरीही लग्नाचा विचार करणं तुमच्यासाठी योग्य नाही. हे सांगण्यात आलं आहे.

- Advertisment -

Manini