Wednesday, May 8, 2024
घरमानिनी'या' मसाल्यात आहेत Beauty secrets

‘या’ मसाल्यात आहेत Beauty secrets

Subscribe

किचनच्या मसाल्यांमध्ये बडीशोप ही फार कामी येते. पदार्थांची चव वाढवण्यासाठी याचा वापर केला जाते. तसेच आरोग्यासाठी सुद्धा बडीशेप फायदेशीर मानली जाते. परंतु तुम्हाला माहिती आहे का, बडीशेप ही तुमच्या त्वचेसाठी फार फायदेशीर असते.

डाग दूर करते
बडीशेपमध्ये असलेले अँन्टी-ऑक्सिडेंट शरिरातील हानिकारक कण नष्ट करतात. त्याचसोबत शरिराला आतमधून स्वच्छ करते आणि त्वचेवरील डाग दूर करते.

- Advertisement -

एलर्जीपासून बचाव
बडीशेपमुळे शरिरात असलेले हानिकारक बॅक्टेरियाशी लढण्यास मदत होते. तसेच खाज किंवा अन्य एलर्जी पासून बचाव करण्यास मदत करते.

डाग-पुटकुळ्या कमी करते
बडीशेप खाल्ल्याने चेहऱ्यावरील डाग-पुटकुळ्या कमी होण्यास मदत होते. कारण शरिरातील घाण बडीशेपमुळे दूर होते.

- Advertisement -

अँन्टी एजिंगची लक्षण कमी होतात
बडीशेप दररोज खाल्ल्याने एजिंगची लक्षण कमी होऊ लागतात. याच्या लक्षणापासून तुम्ही दूर राहता.

त्वचेला एक्सफोलिएट करतात
बडीशेपचा वापर केल्याने एक्सफोलिएट करण्यासाठी सुद्धा केला जातो. यामुळे डेड स्किन सेल्स दूर होतात आणि त्वचेला चमक येते.

त्वचेला चमक येण्यासाठी
बडीशेपचा वापर चेहऱ्यावरील डाग आणि त्वचा उजळ दिसण्यास ही केला जातो. याचा वापर टोनरच्या रुपात ही करतात.

डोळ्यांची सूज कमी होते
बडीशेपचे पाणी कापसावर घ्यावे आणि ते डोळ्यांना लावावे. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. असे केल्याने डोळ्याच्या आजूबाजूची सूज कमी होईल.


हेही वाचा- Beauty Tips : हाता पायाचे टॅनिंग कसे घालवाल, वापरा ‘या’ टीप्स

- Advertisment -

Manini