Tuesday, April 30, 2024
घरमानिनीBeautyBeauty Tips : लांब आणि दाट पापण्या हव्यात? करा हे घरगुती उपाय

Beauty Tips : लांब आणि दाट पापण्या हव्यात? करा हे घरगुती उपाय

Subscribe

मुलींच्या सौंदर्यात डोळ्यांचे महत्व अधिक आहे. तसेच सौंदर्यात डोळेही महत्वाची भूमिका बजावतात. डोळ्यांचा मेकअप, भुवया आणि पापण्या सुंदर आणि लांब, दाट असल्याशिवाय डोळे टपोरे दिसत नाहीत. पण या पापण्या कोणत्याही कॉस्मेटिकचा वापर न करता नैसर्गिकरित्या (eyelashes longer) जाड झाल्या तर? जर तुम्हालाही जाड पापण्या आवडत असतील, पण जास्त कॉस्मेटिक वापरणे टाळायचे असेल, तर आज तुम्हाला असे घरगुती उपाय सांगतो, ज्याचा वापर करून तुम्ही कोणत्याही कॉस्मेटिकशिवाय दाट पापण्या मिळवू शकाल.

कोरफड जेल

कोरफड जेल आपल्या त्वचेसाठी जितके चांगले असते तितके ते पापण्या जाड करण्यासाठी ते अधिक प्रभावी आहे. काजळ लावण्याची स्टिक पूर्णपणे स्वच्छ करा आणि त्याचा वापर करून पापण्यांवर कोरफड जेल लावा. या उपायाचा अवलंब करत राहिल्यास पापण्यांची वाढ झपाट्याने होते.

- Advertisement -

खोबरेल तेल

केसांची निगा राखण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर बराच काळ केला जात आहे. खोबरेल तेलामध्ये आढळणारे लॉरिक ऍसिड केसांची वाढ सुधारते. नारळाच्या तेलाने पापण्यांचे पोषण करण्यासाठी, रात्रीच्या वेळी कापसाच्या मदतीने केसांना लावा आणि सकाळी चेहरा धुवा आणि स्वच्छ करा. डेली रुटीनमध्ये ऑलिव्ह ऑइलचा समावेश करून आपण पापण्यांची वाढ झपाट्याने करू शकता.

ग्रीन टी

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ग्रीन टीने पापण्या जाड, काळ्या आणि लांब करू शकता. ग्रीन टी आधी पाण्यात उकळून घ्या. थंड झाल्यावर हे पाणी आयलॅशेसला लावा. असे आठवड्यातून तीनदा करा आणि पाहा फायदे.

- Advertisement -

केमिकलचा वापर टाळा

तुम्ही कोणतंही मास्क पापण्यांसाठी घरी तयार करताना त्यामध्ये केमिकल वापरलं जाणार नाही याची नीट काळजी घ्या. तसंच तुम्ही जेव्हा दाट पापण्यांसाठी घरगुती मास्क बनवाल तेव्हा तुमच्या रोजच्या आहारामध्ये प्रोटीन आणि व्हिटामिन असणाऱ्या पदार्थांचं सेवन करणं जास्त गरजेचं आहे. या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. त्याने तुमच्या डोळ्यांच्या पापण्या अधिक सुंदर आणि दाट होण्यास मदत मिळते.

पोषण

केसांची वाढ करण्यासाठी, शरीरातील पोषण राखणे आवश्यक आहे. जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने युक्त आहारामुळे केसांची वाढ तर वाढतेच पण केस गळणेही कमी होते.

___________________________________________________________

हेही पहा

- Advertisment -

Manini