Thursday, May 16, 2024
घरमानिनीHealthशरीरातील 'या' अवयवांवर जमतात चरबीचे थर, असे करा गायब

शरीरातील ‘या’ अवयवांवर जमतात चरबीचे थर, असे करा गायब

Subscribe

शरिरात काही ठिकाणी चरबी जमा झाल्याने आपल्या शरिराचा आकार बिघडला जातो. अशातच काही समस्यांचा सुद्धा सामना करावा लागतो. शरिरात काही ठिकाणी चरबी जमा झाल्याच्या कारणास्तव वजन ही वाढले जाते. शरिराला टोन्ड बनवण्यासाठी एक्सरसाइज करणे अत्यंत गरजेचे असते. मात्र काही महिलांकडे अधिक वेळ नसतो, ज्या जिमला जाऊन बॉडी टोन्ड करण्यासाठी एक्सरसाइज करतील. मात्र काही हलक्या एक्सरसाइजच्या मदतीने तुम्ही शरिरावरील चरबी दूर करू शकता. (Body fat reduce tips and workout)

हाताच्या दंडावर जमा झालेली चरबी

- Advertisement -


हाताच्या दंडावर वयासह चरबी वाढत जाते. कारण वाढत्या वयानुसार तुमचा मेटाबॉलिक रेट कमी होऊ लागतो आणि त्यामुळेच हाताच्या दंडावर चरबी जमा होचे. तसेच तुम्ही शरिराची हालचाल किंवा एखादी अॅक्टिव्हिटी करत नसाल तरीही ही चरबी जमा होते.

आर्म्स फॅट कमी करायचे असतील तर तुम्ही पुश अप्स करु शकता. यामुळे तुमचे दंड मजबूत आणि टोन होण्यास मदत होईल. त्याचसोबत ट्रायसेप डिप्स, ट्राइसेप डिप्स तुमच्या दंडाच्या मागील बाजूस मजबूती देऊ शकतात. या व्यतिरिक्त बायसेप कर्ल्स ही एक्सरसाइज ही करू शकता.

- Advertisement -

मांड्यांमधील चरबी


मांड्यांमधील चरबी अन्य अवयवयांच्या येथे असलेल्या चरबीप्रमाणेच, अनुवंशिक, हार्मोनल कारणे, लाइफस्टाइल आणि आहारासंबंधित सवयींमुळे जमा होऊ शकते. येथील चरबी कमी करण्यासाठी तुम्ही वॉल सिट, सायकल चालवणे, रश्शी उड्या मारणे अशा एक्सरसाइज करू शकता.

पाठीची चरबी


पाठीच्या चरबीला ब्रा बल्ज असे सुद्धा म्हटले जाते. ही चरबी कमी करण्यासाठी तुम्ही आर्म रिचसह प्लँक, सीटिड केबल रो, पुश अप्स अशा काही एक्सरसाइज करू शकता.

पोटाची चरबी


पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही कमी करू शकता. मात्र पोटाची चरबी ही विविध आरोग्याच्या जोखिमांशी जोडलेली असू शकते. ज्यामध्ये हृदयरोग, टाइप-2 मधुमेह आणि मेटाबोलिक सिंड्रोमचा समावेश आहे. पोटाची चरबी कमी करण्यासाठी क्रंचेज आणि प्लँक अशी एक्सरसाइज करू शकता.


हेही वाचा- Upper Body च्या बळकटीसाठी करा ‘या’ एक्झरसाइज

- Advertisment -

Manini