निरोगी आरोग्यासाठी 7-8 तासाची झोप घेणं महत्वाचे आहे. परंतु अनेकांना दिवसभर कितीही काम केलं, प्रवास केला तरी रात्रीची शांत झोप येत नाही. हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, झोप न येणं यामागे पौष्टीक आहाराची कमतरता तसेच इतर अनेक कारणं असू शकतात.
रात्री शांत झोप न येण्याची कारणे
- पौष्टीक आहार नसल्यास
पौष्टीक आहार नसल्यास झोपेवर याचा परिणाम होतो. पुरुषांपेक्षा महिलांना रात्रीची झोप येत नाही. कारण पुरूषापेक्षा स्त्रियांमध्ये झोप न येण्याचे मुख्य कारण पौष्टीक आहार नसणे हे आहे. त्यामुळे नियमित आहारात पौष्टिक आहार घ्यावा.
- अति विचार करणे
बऱ्याचदा एखाद्या गोष्टीचा आपण सातत्याने विचार करत राहिल्यास त्याचा परिणाम झोपेवर देखील होतो. विचार करत राहिल्यामुळे झोप येत नाही. त्यामुळे रात्री झोपताना अर्धा कप दुध आणि त्यात जायफळ पावडर टाकून घ्या, हा अतिशय चांगला उपाय आहे. यामुळे लगेचच झोप येते.
- कमी हालचाल असल्यास
अनेक जण दिवसभर काम करतात. मात्र, तरी देखील ते दमत नाहीत. त्यामुळे अंगातला घाम देखील निघत नाही. त्यामुळे दररोज सकाळी लवकर उठून व्यायाम करा. यामुळे फ्रेश देखील वाटेल आणि काम करण्याचा उत्साह वाढेल. त्यामुळे तुम्ही दमाल आणि त्यामुळे तुम्हाला रात्री चांगली झोप लागेल.
- झोपण्याआधी चहा, कॉफीचे सेवन
अनेकांना रात्री झोपण्याआधी चहा, कॉफी, चॉकलेट आणि साखर असे पदार्थ खाण्याची सवय असते. या पदार्थांचे झोपण्याआधी सेवन केल्यामुळे त्याचा झोपेवर परिणाम होतो. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी या पदार्थांचे सेवन करणे टाळा.
- झोपेची वेळ चुकवू नका
प्रत्येक व्यक्तीची झोपेची एक वेळ असते. त्या व्यक्तीला त्या वेळेतच झोप येते. त्यामुळे ज्यावेळेत तुम्हाला झोप येते ती वेळ चुकवू नका. एखाद्यावेळेस जर झोपेची वेळ चुकवल्यास पुन्हा झोप येत नाही.