Wednesday, April 24, 2024
घरमानिनीHealthगाढ आणि शांत झोपेसाठी फॉलो करा या टिप्स

गाढ आणि शांत झोपेसाठी फॉलो करा या टिप्स

Subscribe

झोप ही शारीसाठी अत्यंत महत्वाची असल्याने ती पूर्ण होणे अत्यंत आवश्यक असते. अपूर्ण झोपेचा आपल्या दिनचर्येवर परिणाम होऊ शकतो. यासाठी तज्ज्ञ कायम 7 ते 8 तासांची झोप घेण्याचा सल्ला देतात. पुरेशी झोप घेतल्याने आपले शरीर आणि मन रिचार्ज होऊ शकते शिवाय पूर्ण झोपेमुळे दिवसभर तुम्हाला ताजेतवाने वाटते. पण आजकालच्या बिझी आणि चुकीच्या लाइफस्टाइलमुळे अनेकांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे अनेकजण विविध आजारांनी ग्रासले जात आहेत. अशावेळी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो केल्यात तर तुम्हाला सहज गाढ आणि शांत झोप लागण्यास मदत होईल.

टाईमटेबल बनवा – शांत आणि गाढ झोप येण्यासाठी सातत्यपूर्ण झोपेचे आणि उठण्याचे टाईमटेबल असणे आवश्यक आहे. ज्यामुळे शरीराला त्याची सवय होईल आणि वेळेत झोपणे आणि वेळेत उठणे ही सवय आपसूकच आत्मसात होईल. झोप येण्यासाठी पुस्तक वाचणे, अंघोळ करणे किंवा दीर्घ श्वास यासारख्या गोष्टींचा सराव केल्याने मेंदू आणि शरीर झोपेसाठी तयार होण्यास मदत मिळते.

- Advertisement -

दररोज व्यायाम करणे – जे लोक रोज व्यायाम करतात ते रात्री शांत झोपू शकतात. शांत झोप लागल्याने त्यांना दुसऱ्या दिवशी अगदी फ्री वाटते. तुम्ही जर निद्रानाशेच्या समस्येने हैराण झाले असाल तर नियमित व्यायाम करण्याचा सराव करा.

योग्य बिछाना महत्वाचा – जर तुमची झोपण्याची गादी आरामदायी असेल तर सहजपणे तुम्हाला शांत झोप लागू शकते. उच्च प्रतीची गादी शरीराला योग्य पवित्रा आणि पाठीचा कणा सरळ ठेवण्यास मदत करते. इतकंच काय तर उच्च प्रतीच्या गादीमुळे त्वचा निरोगी राहते. जर तुमची झोपायची गादी उच्च प्रतीची नसेल तर दुसऱ्या दिवशी तुमच्या संपूर्ण शरीरात वेदना जाणवू शकतात. ज्याने तुमची चिडचिड होऊ शकते.

- Advertisement -

खोलीचे वातावरण – झोपेच्या वातावरणात खोलीचे तापमान याचाही समावेश असतो. जर झोपताना खोलीचे वातावरण चांगले असेल तर तुमचे शरीर मेंदूला सिग्नल पाठवते की, झोपण्याची वेळ आली आहे. म्हणून झोपताना खोलीचे तापमान सामान्य असणे गरजेचे असते.

स्क्रीन टाईमपासून दूर राहा – स्मार्टफोन, टॅबलेट आणि पीसीद्वारे झालेला निळा प्रकाश शरीरातील मेलॅटोनिनच्या विकासात व्यत्यय आणू शकतो. हा हार्मोन, झोपेची भावना निर्माण करण्याचे काम करतो. चांगल्या आणि गाढ झोपेसाठी झोपण्याआधी स्क्रीनपासून दूर रहाणे गरजेचे असते. तसेच स्क्रीनच्या ब्लु लाईटचा प्रभाव कमी करण्यासाठी नाईट मोड सेटिंग्ज किंवा ब्लु लाईट ब्लॉकिंग ग्लासेस तुम्ही वापरू शकता.

आहार – खाण्यापिण्याच्या सवयीचा झोपेवरही परिणाम होऊ शकतो. खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देऊन स्वतःला निरोगी ठेऊ शकता आणि त्याने रात्री शांत झोप तुम्हाला लागू शकते. यासाठी आहारात फळे आणि भाज्या यांचा समावेश करा. मद्यपान करताना जास्त प्रमाणात अल्कोहोल, निकोटीन आणि कॅफीनचे सेवन करणे टाळा. झोपण्यापूर्वी कॅफीनचे सेवन केल्यास झोप येण्यास अडचणी येतात. त्यामुळे चुकूनही झोपेच्या आधी कॅफीनचे सेवन करू नका.

 

 

 


हेही वाचा :

- Advertisment -

Manini