प्रेग्नेंसीचा अनुभव प्रत्येक महिलेसाठी सुंदर असतो. परंतु जेव्हा मुलं नको असेल तेव्हा बहुतांश महिला बर्थ कंट्रोल पिल्सचे सेवन करतात. खरंतर मार्केटमध्ये विविध बर्थ कंट्रोल पिल्स मिळतात. या बर्थ कंट्रोल पिल्सचे सेवन सेक्सच्या 24 ते 48 अथवा 72 तासांच्या आतमध्ये केले जाते. या गोळ्या पाण्यासह घेतल्या जातात. परंतु तुम्हाला माहितेय का, तुम्ही या गोळ्या पाण्याशिवाय ही खाऊ शकता. बर्थ कंट्रोलमध्ये अशा सुद्धा पिल्स येतात ज्या पाण्यासह नव्हे तर चावून खाल्ल्या जाऊ शकतात.
खरंतर चावून खाल्ल्या जाणाऱ्या बर्थ कंट्रोल पिल्समध्ये एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टिन नावाचे दोन हार्मोन असतात. हे दोन्ही हार्मोन ओव्युलेशन रोखणे आणि प्रेग्नेंसीचा धोका कमी करण्याचे काम करू शकतात.
आता पर्यंत बर्थ कंट्रोल पिल्स पाण्यासोबत खाऊ शकत होतो.परंतु चावून खाल्ल्या जाणाऱ्या पिल्सला पाण्याची गरज नाही. त्या अशा प्रकारे डिझाइन केलेल्या असतात ज्या चावून किंवा क्रश करून खाऊ शकता येतात. या पिल्स अशा महिलांसाठी तयार करण्यात आल्या आहेच ज्यांना पाण्यासह गोळ्या घेणे आवडत नाही.
काय काम करतात बर्थ कंट्रोल पिल्स
बर्थ कंट्रोल पिल्समध्ये एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टिन असल्याच्या कारणास्तव हे एग्सला ओवरीमध्ये इंप्लाट होण्यापासून रोखात.
चावून खाल्ल्या जाणाऱ्या बर्थ कंट्रोल पिल्सचे फायदे आणि नुकसान
-चावून खाल्ली जाणारी पिल्स ही अन्य पिल्स प्रमाणे समान फायदेशीर असते.
-बहुतांश प्रकरणांमध्ये यामुळे काही नुकसान होत नाही. परंतु काहीवेळेस चावून खाल्ल्या जाणाऱ्या बर्थ कंट्रोल पिल्सच्या सेवनाने ब्लड क्लॉटची समस्या होऊ शकते.
हेही वाचा- स्पाइनल टीबी पासून असा करा बचाव