Wednesday, May 15, 2024
घरमानिनीHealthस्पाइनल टीबी पासून असा करा बचाव

स्पाइनल टीबी पासून असा करा बचाव

Subscribe

ट्युबरक्लोसिस ज्याला आपण सामान्य भाषेत टी.बी. च्या नावाने ओळखले जाते. आपल्या सर्वांना माहिती आहे की, टीबी हा फुफ्फुसात होणारा आजार आहे. या कारणास्तव सातत्याने व्यक्ती खोकत राहतो. परंतु तुम्हाला माहितेय का, टीबा हा तुमच्या पाठीच्या कण्यात सुद्धा होऊ शकतो. या टीबीला स्पाइनल टीबी असे म्हटले जाते. याच बद्दल एक्सपर्ट्स काय बोलतात हे पाहूयात.

एक्सपर्ट्स असे म्हणतात की, माइक्रोबॅक्टेरियम नावाचा किटाणू जेव्हा पाठीच्या कण्यातील टिश्यूमध्ये जातो तेव्हा तेथे संक्रमण तयार होते. याच कारणास्तव पाठीचा कण्यात टीबीची समस्या निर्मा होते. पाठीच्या कण्यात होणारा टीबी इंटर वर्टिबल डिस्कमध्ये सुरु होतो. त्यानंतर पाठीच्या कण्यात फैलावला जातो. जर वेळीच उपचार केला नाही तर व्यक्ती अधू होऊ शकतो.

- Advertisement -

याची लक्षणे काय आहेत?
-पाठीत दुखणे
-वजन कमी होणे
-वारंवार ताप येणे
-भूक न लागणे
-थकवा वाटणे
-हाडं कमजोर होणे

कशी पुष्टी केली जाते
पाठीच्या कण्यातील टीबीबद्दल जाणून घेण्यासाठी एक्स-रे काढू शकता. जर यामध्ये दिसले नाही तर एमआरआय काढू शकता. यामुळे कळते की, कोणत्या टिश्यूमध्ये समस्या झाली आहे आणि किती डॅमेज झाला आहे. या व्यतिरिक्त बायोप्सीच्या माध्यमातून ही ओळखले जाऊ शकते. जेव्हा स्पाइनल टीबी झाल्याची पुष्टी होते तेव्हा औषधांसह एंटीट्युबरक्युलर थेरपी ही केली जाते.

- Advertisement -

हेही वाचा- व्हजायनल पीलिंगची ‘ही’ आहेत लक्षणं…

- Advertisment -

Manini