Sunday, April 14, 2024
घरमानिनीHealthनारळ पाणी, ताकच नाही तर या पेयांनी देखील उन्हाळ्यात मिळेल गारवा

नारळ पाणी, ताकच नाही तर या पेयांनी देखील उन्हाळ्यात मिळेल गारवा

Subscribe

दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढत असून आतापासूनच आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. प्रामुख्याने या दिवसात तापमानात वाढ झाल्याने अंगाला घाम येतो. घामाद्वारे जरी शरीरारातील विषारी द्रव बाहेर पडत असली तरी त्याबरोबरच पाण्याचा अंशही कमी होतो. यामुळे या दिवसात मुबलक पाणी पिणे गरजेचे आहे. यासाठी वेगवेगळ्या पेयाद्वारे शरीरातील पाण्याची कमतरता भरुन काढता येते.

उन्हाळ्यात ‘या’` पेयांमुळे दूर होईल पाण्याची कमतरता

  • कैरीचे पन्हे

Premium Photo | Kairi panha or panna or raw mango drink is a traditional and most popular indian summer beverage served in a glass over colourful or wooden background. selective focus

- Advertisement -

उष्माघातापासून वाचण्यासाठी कैरीचे पन्हे खूप फायदेशीर आहे. यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात शिवाय पचनक्रिया देखील सुरळीत राहते. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. हे टीबी, अॅनिमिया आणि कॉलरा यांसारख्या आजारांवरही औषधाप्रमाणे काम करते.

  • ताक

Buttermilk - Wikipedia

- Advertisement -

ताक पिण्याचे आरोग्यदायी फायदे आहेत. ताक हे थंड असल्याने शरीराचे तापमान समप्रमाणात राखण्याचे काम ताक करते. ताकात हिंग, कोथिंबीर, पुदिना आणि धने जिरेपूड टाकल्यास अधिक चवीष्ट लागते. शरीराची उष्णता कमी करण्यासाठी आपण ताकाचा आपल्या दररोजच्या आहारामध्ये समावेश करणे आवश्यक आणि फायदेशीर आहे.

  • नारळ पाणी

Health Benefits Of Coconut Water – Forbes Health

नारळ पाणी शरीराला हायड्रेटेड ठेवते. ज्यांना मूतखड्याचा त्रास असेल त्यांनी या दिवसात पाणी जास्तीत जास्त प्यावे. तसेच नारळ पाणीही पित राहावे. उन्हाळ्यात सतत घाम येत असल्याने शरीरातील पाणी कमी होत असते. अशावेळी चक्कर येणे ब्लड प्रेशर लॉ होणे अशा आरोग्यविश्यक समस्या निर्माण होतात. यामुळे नारळ पाणी आणि पाणी जास्तीत जास्त प्याव

  • जलजिरा

Buy Jal Jeera Masala Online - Jal Jeera Mix | Planet Spices

उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी जलजिरा हे उपयुक्त पेय आहे. विशेष म्हणजे जलजिरा आपण घरीही बनवू शकतो. जिऱ्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. तसेच चयपचयाच्या तक्रारीही दूर होतात.

  • कोकम सरबत

Kokum Sharbat | Roundglass Living

कोकम सरबत आरोग्यवर्धक असून प्रकृतीने थंड आहे. यामुळे शरीरात पित्त, उष्णता वाढल्यास कोकम सरबत पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. तसेच कोकममध्ये हायड्रॉक्सिसिट्रिक अ‍ॅसिड असते ज्यामुळे शरीरातील चरबी वितळण्यास मदत होते. तसेच शरीरात थंडावा निर्माण होतो. यामुळे उन्हाळ्यात कोकम सरबत पिणे फायदेशीर ठरते.

  • बेलाचा रस

Bael ka Sharbat 🍹//Summer special Bel Juice Recipe / Wood Apple Squash /बेल का शरबत/Raunak's Recipe - YouTube

 

उन्हाळ्यात बेलाच्या फळाचा रस पिणे फायदेशीर असते. हे रक्तातील शुगर नियंत्रणात ठेवण्याचे काम बेलाच्या रस करते. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्याबरोबरच कोलेस्टेरॉल धोकाही कमी होतो.


हेही वाचा :

Summer Drink : उन्हाळ्यात सब्जा खाण्याचे गुणकारी फायदे

- Advertisment -

Manini