घरमहाराष्ट्रPolitics: मुख्यमंत्र्यांचे कपडे घालून फिरतात तेच चिक्कार; राऊतांचा शिंदेंना टोला

Politics: मुख्यमंत्र्यांचे कपडे घालून फिरतात तेच चिक्कार; राऊतांचा शिंदेंना टोला

Subscribe

मुंबई: महाविकास आघाडीत जागावाटपावरून घमासान सुरू आहे. सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. याबाबत ठाकरे गटाचे खासदार, संजय राऊत यांना प्रश्न केला असता, त्यांनी सविस्तर उत्तर दिलं आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोलाही लगावला आहे. (Politics Sanjay Raut Criticized CM Eknath Shinde over Seat Sharing)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून ठाण्याची जागा जवळपास जाण्याची शक्यता आहे, असं विचारल्यावर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या हातात काहीही राहिलेलं नाही. ते दिल्लीच्या हंटरवर काम करत आहेत. अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दिल्ली दरबारहून आलेल्या आरोपांचं पालन करतात, अशी टीका राऊतांनी केली. तसंच, शिंदे मुख्यमंत्र्यांचे कपडे घालून फिरतात तेच नशिब समजा, असं म्हणत राऊतांनी हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

आज मविआची बैठक

शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांच्या उपस्थितीत आज 4:30 वाजता बैठक होणार आहे. वंचित बहुजन आघाडीशी चर्चा सुरू आहे. त्यांनी जागा जाहीर केल्या आहेत तरीही चर्चा सुरू आहे. निवडणूक व्हायला वेळ आहे. आमची चर्चा निरंतर सुर आहे, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

भाजपाची मदत होऊ देणार नाही

सांगलीतल्या काँग्रेसमधल्या काही व्यक्ती बोलत असतील तरी चालेल. आम्ही कटुतेने काही बोलणार नाही, हे महाविकास आघाडी म्हणून स्पष्ट केलं आहे. सांगलीतल्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या असतील. अशाच भावना कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

- Advertisement -

अमरावती, रामटेक, कोल्हापूर या जागांवर आम्ही लढतो आहोत. त्या हसत हसत काँग्रेसला दिल्या कारण महाविकास आघाडी आहे. फक्त आपल्याच पक्षाच विस्तार करण्यासाठी आघाडी होत नाही. सांगलीची जागा चंद्रहार पाटील 100 टक्के जिंकणार आहेत. काही व्यक्तिगत कारणांमुळे कोणाला भाजपाला मदत करायची असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील निवडून येतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक त्यांचा प्रचार लवकरच करताना दिसतील. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

(हेही वाचा: Lok Sabha 2024: …म्हणून त्यांना उसन्या भाटांची गरज पडली नाही; अंबादास दानवे यांची शिवसेनेवर टीका)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -