Tuesday, April 30, 2024
घरमानिनीKitchenMonsoon Recipe : घरी बनवा मक्याची कुरकुरीत भजी

Monsoon Recipe : घरी बनवा मक्याची कुरकुरीत भजी

Subscribe

पावसाळा आला की गरमागरम भज्या आणि पकोडे खावेसे वाटतात. अशातच पावसाळ्यात मका हा बाजारात जास्त येतो. मक्याचे खूप प्रकार करता येतात. मका हा पचायला हलका असतो तसेच मक्यामध्ये प्रोटिन्स देखील जास्त प्रमाणात असतात. चला तर मग जाणून घेऊया कुरकुरीत मक्याची भजी कशी करतात. (Crispy corn pakoda recipe)

साहित्य
-200 ग्रॅम मक्याचे दाणे
-3 चमचे तांदळाचे पीठ
-50 ग्रॅम बेसनपीठ
-1 टेबलस्पुन जीरे
-1 टेबलस्पुन ओवा
-1 टेबलस्पुन लाल तिखट
-चवीनुसार मीठ
-2 हिरवी मिरची
-1 कांदा बारीक चिरून
-तळण्यासाठी तेल

- Advertisement -

कृती
वाफवलेला मका 1 वाटी घ्या त्यातले 2 ते 3 चमचे मकी दाणे बाजुला काढुन घ्या.आणि शिल्लक राहिलेला मका मिक्सर मधून जाडसर वाटुन घ्या. आणि बाजुला काढलेला मका त्यात घाला.त्यात तांदळाचे पीठ, बेसनपीठ घाला. यानंतर जीरे, ओवा, बारीक चिरलेला कांदा, लाल तिखट, हळद घालुन छान मिक्स करून घ्या. सर्व साहित्य एकत्र करून घ्या.हे झाल्यानंतर पाणी न घालता छान गोळा मळुन घ्या चवीनुसार मीठ घाला.गॅस वर पॅन ठेवुन तळण्यासाठी तेल टाका.
तेल गरम झाले कि मंद गॅसवर छान कुरकुरीत भजी तळुन घ्या.आता गरमागरम कुरकुरीत मका भजी सर्व्ह करा.

- Advertisement -

हेही वाचा- Monsoon Recipe : Healthy आणि टेस्टी ओव्याची भजी

- Advertisment -

Manini