Tuesday, April 30, 2024
घरमानिनीHealthआजीच्या बटव्यातील हे आहेत सात आजारांवरील सात उपचार

आजीच्या बटव्यातील हे आहेत सात आजारांवरील सात उपचार

Subscribe

आजकाल आजार झाला तरी लगेच मेडिकल किंवा डॉक्टरांकडून आपण औषधं घेऊन येतो. मात्र औषधांच्या अधिक सेवनाने याचा परिणाम किडनी, यकृत आणि शरिरातील अन्य अवयवांवर सुद्धा होचो. अशातच तुम्ही आजीच्या बटव्यातील काही उपचार तुम्ही अशा लहान आजारांवर करू शकता. सर्दी-खोकला असो किंवा वजन कमी करायचे असेल तुम्ही नक्कीच हे उपाय करून पाहू शकता. (Aajibaicha Batawa)

पोटासंबंधित समस्या
जर तुम्हाला पोटासंबंधित समस्या असेल तर मधातील आवळा खाल्ल्यास तुमचे यकृत हेल्दी राहते आणि पोटासंबंधित समस्या ही उद्भवत नाही.

- Advertisement -

सर्दी-खोकला
दररोज 1 मोठी वेलचीची चहा पिऊ शकता. यामुळे ऋतूनुसार होणारे इन्फेक्शन, कफ आणि हृदय रोग दूर राहतात. त्याचसोबत ब्लड सर्कुलेशन ही वाढते.

घसा खवखवणे
रात्री झोपण्यापूर्वी कोमट गरम दूधात काळी मिरी पूड आणि हळद टाकून प्या. या व्यतिरिक्त तुम्ही कोमट पाण्यात लिंबू आणि पाणी टाकून त्याच्या गुळण्या करू शकता. यामुळे लवकर आराम मिळेल.

- Advertisement -

दात दुखणे
दात दुखत असतील तर कडुलिंबाची 2-3 पानं चावून खा. अथवा कडुलिंबाचे तेल लावल्याने सुद्धा दात दुखीपासून आराम मिळेल.

डोकेदुखी
डोकेदुखी झाल्यानंतर पेनकिलर नव्हे तर 10-12 बदाम खा. अथवा नाकात बदाम तेलाचे थेंब टाकल्याने ही डोकेदुखीपासून आराम मिळेल.

बळकट हाडं
बळकट हाडांसाठी तुम्ही दररोज पोळीला तूप लावून खा. त्यामुळे हाडं मजबूत होतील. त्याचसोबत सांधे दुखी आणि केस गळतीची समस्या सुद्धा दूर होते.

वजन कमी करण्यासाठी
वजन कमी करण्यासाठी तुम्ही बडीशेप खा. यासाठी दररोज 1 ग्लास पाण्यात बडीशेप टाकून त्याचे पाणी प्या.


हेही वाचा- वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल Ginger पावडर

- Advertisment -

Manini