Saturday, May 4, 2024
घरमानिनीक्रिप्टिक प्रेग्रेंसी म्हणजे नक्की काय?

क्रिप्टिक प्रेग्रेंसी म्हणजे नक्की काय?

Subscribe

एखाद्या महिलेसाठी आई होण्याचा अनुभव हा फार सुंदर असतो. यामध्ये तिला फार आनंद होत असतोच पण स्वत:वर येणाऱ्या जबाबदाऱ्यांमुळे ती थोडी चिंतेत ही असते. तर मासिक पाळी आल्यानंतर तिला कळते की, आई होणार आहे. पण अशी काही परिस्थिती निर्माण होते ज्यामध्ये महिलेला कळत नाही की, खरंच प्रेग्नेंट आहे. यालाच क्रिप्टिक प्रेग्नेंसी असे म्हटले जाते.

क्रिप्टिक प्रेग्नेंसी म्हणजे नक्की काय?
क्रिप्टिक प्रेग्नेंसी मध्ये महिलेला कळत नाही की, ती खरंच प्रेग्नेंट आहे. अशा स्थितीत २० आठवड्यापर्यंत प्रेग्नेंसी बद्दल काही कळत नाही. यावेळी मासिक पाळी आली नाही तरीही चाचणी निगेटिव येते.

- Advertisement -

क्रिप्टिक प्रेग्नेंसीची लक्षण
गर्भधारणेनंतर दोन आठवड्यानंतर महिलांच्या स्तनांना सूज येणे, मूड स्विंग होणे, थकवा वाटणे किंवा मळमळ होणे अशी लक्षण दिसून येतात. परंतु क्रिप्टिक प्रेग्नेंसीमध्ये मासिक पाळी आली नाही तरीही महिला त्याला इररेग्युलर पीरियड्स असे मानतात.

- Advertisement -

क्रिप्टिक प्रेग्नेंसीचे कारण
हार्मोनल असंतुलित आणि मानसिक कारणांमुळे क्रिप्टिक प्रेग्नेंसीला सामोरे जावे लागते. अशा प्रकारच्या गर्भावस्थेत एका महिलेला मानसिक आणि शारिरीक रुपात थकवा येतो.

या गोष्टींवर पडतो प्रभाव
ज्या महिलांना दीर्घ काळानंतर मासिक पाळी येते तेव्हा त्यांना हे कळत नाही की, त्या प्रेग्नेंट आहेत. अशातच महिलांना आपल्या प्रेग्नेंसी बद्दल अशावेळी कळते जेव्हा त्या तिसऱ्या महिन्यात असतात.

या व्यतिरिक्त महिलांना फर्टिलिटी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांना कळत नाही की, त्या प्रेग्नेंट आहेत. प्रेग्नेंसी दरम्यान होणारी ब्लिडिंगला ते लाइट पीरियड मानून इग्नोर करतात. त्याचसोबत क्रिप्टिक प्रेग्नेंसीमध्ये महिलेचे पोट दिसून येत नाही. पण जी लोक जाड असतात त्यांना सुद्धा आपले पटकन बेबी बंप दिसत नाही.

तज्ञांचे असे म्हणणे आहे की, ज्या महिला काही खास प्रकारच्या मानसिक आजारांचा सामना करत असतात त्या क्रिप्टिक प्रेग्नेंसीचा निर्णय स्विकारु शकत नाहीत. त्यांना माहित असून ही त्याकडे त्या दुर्लक्ष करतात. एका अभ्यासानुसार क्रिप्टिक प्रेग्नेंसी नॉर्मल प्रेग्नेंसीपेक्षा अधिक काळ असते.


हेही वाचा- ‘या’ फूड्समुळे वाढू शकतात Labour Pain

- Advertisment -

Manini