Saturday, April 27, 2024
घरमानिनीHealthअचानक वजन वाढण्याची कारणे

अचानक वजन वाढण्याची कारणे

Subscribe

शरीराचे वाढते वजन चिंतेचे कारण असू शकते. तथापि, वयानुसार शरीराच्या वजनात चढ-उतार होणे सामान्य आहे. तरीही, शरीराचे वजन राखण्यासाठी काही जण जेवण सोडणे मान्य करतात तर काही जण व्यायामाची मदत घेतात . पण, वजन कमी करण्यापूर्वी वजन वाढीची त्याची कारणे जाणून घेणे आवश्यक असते. जाणून घेऊयात अशी करणे ज्याने शरीरात वजन झपाट्याने वाढू लागते

तज्ज्ञांच्या मते, रेडी तू इट फूडचे सेवन वाढल्याने शरीरात अनेक समस्यांचा धोका वाढतो आणि त्यातील एक म्हणजे लठ्ठपणा. प्रोसेड्स फूडमध्ये साखर आणि तेलाचे प्रमाण जास्त असल्याने शरीरातील वजन वाढण्याची समस्या वाढते. यामुळे महिलांना हार्मोनल असंतुलन, थायरॉईड आणि कुपोषणाची समस्या जाणवते. यामुळे शरीरात कॅलरीज जमा होतात ज्याने लठ्ठपणा वाढतो. यासाठी चरबीयुक्त पदार्थ खाणे आवश्यक असते.

- Advertisement -

वजन वाढण्याची कारणे

प्रोटिन्सची कमतरता – एका संशोधनात, प्रोटिन्सची कमतरता हे लठ्ठपणाचे कारण असल्याचे सिद्ध झाले आहे. वास्तविक, वाढत्या प्रोटिन्सच्या कमतरतेमुळे एखाद्याला वारंवार भुकेच्या समस्येला सामोरे जावे लागते. आहारतज्ञांच्या मते, प्रोटिन्सच्या कमतरतेमुळे वॉटर रिटेन्शन वाढते, ज्याने लठ्ठपणा वाढतो.

- Advertisement -

तणावात वाढ – नैराश्य, हाय ब्लड प्रेशर आणि निद्रानाश याशिवाय शरीरातील ताणतणावांमुळे वजन वाढण्याची समस्या उद्भवते. एका अभ्यासानुसार, तणावामुळे शरीरातील चयापचय क्रिया मंदावते. कॉर्टिसॉल हा तणाव संप्रेरक आहे. शरीरात त्याच्या नियमित उपस्थितीमुळे पोषणाची पातळी योग्य राहते. पण, स्ट्रेरॉईड्ससारख्या औषधांनी शरीरात कॉर्टिसॉलची पातळी वाढल्याने वजनही वाढू लागते.

हार्मोनल बदल – पिरियड सायकलच्या सुरुवातीपासून ते PCOS, प्रेग्नसी आणि मेनोपौजपर्यंत महिलांना हार्मोनल असंतुलनचा सामना करावा लागतो. PCOSग्रस्त महिलांमध्ये पुरुष संप्रेरक एंड्रोजेनच्या वाढीव पातळीमुळे चेहऱ्याचे केस, अनियमित मासिक पाळी आणि वजन वाढते.

हायपोथायरॉइडिझम – जेव्हा शरीरातील थायरॉईड अर्कायक्षम अवस्थेत असते, तेव्हा शरीरातील थायरॉईड ग्रंथी कमी हार्मोन्स तयार करण्यास सक्षम असतात. त्याचा परिणाम चयापचय क्रियांवर दिसून येतो. कमकुवत चयापचय क्रियेमुळे कॅलरी, सहजपणे, बर्न होत नाहीत. त्यामुळे महिलांना वाढत्या वजनांचा सामना करावा लागतो.

 

 


हेही वाचा : दिवसातून कितीवेळा जेवावे?

 

- Advertisment -

Manini