घरमहाराष्ट्रनागपूरओबीसी आरक्षणात नवीन वाटेकरी येऊ देणार नाही; फडणवीसांचं आंदोलकांना आश्वासन

ओबीसी आरक्षणात नवीन वाटेकरी येऊ देणार नाही; फडणवीसांचं आंदोलकांना आश्वासन

Subscribe

नागपूर : कुणबी ओबीसी समाजाकडून नागपूरमध्ये गेल्या आठवड्याभरापासून आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट दिली. यावेळी आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांना आश्वासन दिले की, ओबीसी समाजाच्या आरक्षणात नवीन वाटेकरी येऊ देणार नाही. (OBC reservation will not allow new entrants Fadnavis assurance to the protesters)

हेही वाचा – समान शत्रूला पराभूत करण्यासाठी…; सुजात आंबेडकरांच्या नाराजीनंतर रोहित पवाराचं ट्वीट

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सरकारच्या वतीने एका गोष्टीचं आश्वासन आपल्याला मी निश्चितपणे देऊ इच्छितो की, ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये नवीन वाटेकरी आम्ही येऊ देणार नाही. हे आरक्षण आम्ही कमी होऊ देणार नाही. या आरक्षणावर कुठल्याही प्रकारे या ठिकाणी अडचण राज्य सरकारच्या वतीने आम्ही होऊ देणार नाही. संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या ओबीसी समाजाच्या उपोषणाला भेट दिली असून ते उपोषण मागे घेणार आहेत. त्यामुळे तुम्ही निश्चित व्हा की, ओबीसीच आरक्षण कमी होणार नाही आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी सरकारची भूमिका आहे. त्यामुळे दोन्ही समाजाने आंदोलन करू नये, असेही फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले की, ”मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची भूमिका, पुनर्विचार पिटीशन दाखल करण्यासंदर्भात काम सुरू आहे. एक कमिटी तयार केली असून ज्यांच्याकडे कुणबी दाखले आहेत, त्यांना प्रमाणपत्र देण्यासंदर्भात, शिंदे कमिटी एक महिन्यात आहवाल देईल. कुणबी आणि मराठा समाज एकमेकांसमोर येण्याची परिस्थिती नाही, जेणेकरून महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण खराब होईल. कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजाचे आरक्षण कमी करण्यासंदर्भात किंवा कुणाला देण्यासंदर्भात निर्णय घेणार नाही, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवली.

- Advertisement -

हेही वाचा – Devendra Fadnavis : …तर ती जबाबदारी तुमची होती; फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा

ओबीसी समाजासाठी लवकरच स्वाधार योजना

ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात अंतिम काम सुरू आहे, हे स्पष्ट करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ओबीसी वसतिगृहासह लवकरच स्वाधार योजना लागू होईल. ओबीसी समाजाला घरे मिळावी यासाठी 10 लाख घरे तयार करण्याचे काम सुरू आहे. येत्या आठवड्याभरात मुख्यमंत्र्यांसोबत ओबीसी समितीची एक बैठक मुंबईत होणार आहे, त्यातून ओबीसी समाजाच्या मागण्यासंदर्भात चर्चा सोडविण्याचा प्रयत्न आहे. ओबीसी समाजबाबत आमची वचनबद्धता असल्यामुळे सरकार ओबीसी सोबत आहे. ओबीसींवर अन्याय होणार नाही, तरी आम्ही कुठे चुकलो तर आम्हाला सांगा. सरकार आपल्या पद्धतीने चालते. कंत्राटी संदर्भात विरोधकांकडून अफवा पासरविल्या जात आहेत. मात्र जाहिराती काढून 75 लाख नाही तर दीड लाख नोकऱ्या आम्ही देऊ, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनस्थळी बोलून दाखवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -