आपण नेहमीच कोबी मंच्युरियन खातो आणि हे कसे करतात हे देखील आपल्याला ठाऊक आहे. आज आम्ही तुम्हाला बटाटा मंच्युरियन कसे बनवतात हे सांगणार आहोत.
साहित्य :
- 5-6 बटाटे
- 130 ग्रॅम मैदा
- 2 कप तांदळाचे पीठ
- कांदा
- लसूण
- लाल मिरची पावडर
- खाण्याचा लाल रंग
- रेड चिली सॉस
- ग्रीन चिली सॉस
- टॉमटो सॉस
- व्हाइट विनेगर
- सोया सॉस
- मीठ चवीनुसार
कृती :
- सर्वप्रथम बटाट्याची साल काढल्यानंतर बारिक कापून घ्या. त्यानंतर बारिक कापलेले बटाट्यांमध्ये पाणी आणि मीठ घालून शिजवून घ्या. खूप जास्त बटाटे शिजवू नका.
- शिजवलेले बटाटे थंड होईपर्यंत मंच्युरियनसाठी लागणारे पीठ तयार करा. त्यासाठी मैदा बाऊलमध्ये घ्या. त्यात 2 कप तांदळाचं त्यात टाका. त्यानंतर चिरलेला कांदा आणि लसण्याची पेस्ट, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा मीठ घालावे आणि थोड्याप्रमाणात खाण्याचा लाल रंग देखील घालावा.
- मग या सर्व मिश्रणात थोड थोड पाणी घालून मिक्स करा. मग उकडलेले बटाटे या मिश्रणात घालून पुन्हा मिक्स करून घ्या. त्यानंतर बटाटे मंच्युरियन तळून घ्या. अजून क्रिस्पी करण्यासाठी पुन्हा एकदा तळून घ्या.
- आता एका पॅनमध्ये गरम तेल करा. त्यात बारिक केलेली लसूण आणि कांदा घाला.लसूण आणि कांदा भाजल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेऊन त्यात रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, 2 चमचे टॉमटो सॉस, 1 चमचा व्हाइट विनेगर, 2 चमचे सोया सॉस आणि अर्धा चमचा मीठ घालून ते मिश्रण परतवून घ्यावं.
- त्यानंतर तळलेले बटाटे मंच्युरियन या मिश्रणात मिक्स करून घ्या.
- चटपटीत बटाटा मंच्युरियन सर्वांना सर्व्ह करा.
- Advertisement -
हेही वाचा :
Recipe: जेवणाच्या पंगतीला वाढला जाणारा मसाले भात
- Advertisement -
- Advertisement -