घरदेश-विदेशतुम्हें कभी देश तोडने नहीं दूंगा..., काँग्रेसच्याच Animation Video वरून भाजपाचा पलटवार

तुम्हें कभी देश तोडने नहीं दूंगा…, काँग्रेसच्याच Animation Video वरून भाजपाचा पलटवार

Subscribe

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधकांची आघाडी ‘इंडिया’ यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. काँग्रेसने आज, शनिवारी Animation Videoच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. तर, तुम्हें कभी देश तोडने नहीं दूंगा, सांगत भाजपाने पलटवार केला आहे.

- Advertisement -

साधारण महिन्याभरापूर्वी शोले चित्रपटातील ‘कितने आदमी थे…’ या लोकप्रिय संवादाचा आधार घेत काँग्रेसने Animation Video द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला आहे. त्यापाठोपाठ आता बिग बी अमिताभ बच्चन यांच्या ‘दीवार’ चित्रपटातील ‘क्या है तुम्हारे पास?’ हा लोकप्रिय डायलॉगचा आधार घेत काँग्रेसने नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. तुम्ही ज्या मार्गाने जात आहात, त्याने तुम्हाला कधीही सत्ता मिळणार नाही, असे नरेंद्र मोदी या व्हिडीओमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना सांगताना दिसतात. त्यावर उत्तर देताना, मी ज्या मार्गाने जात आहे, त्याचे परिणाम काहीही झाले तरी चालेल, पण तुम्ही देशाला ज्या मार्गावरून नेत आहात, त्याचे परिणाम वाईट होणार आहेत, असा इशारा राहुल गांधी यांनी दिल्याचे या व्हिडीओत दाखवले आहे.

हेही वाचा – Devendra Fadnavis : …तर ती जबाबदारी तुमची होती; फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा

- Advertisement -

आपल्या दोघांमध्ये एक ‘दीवार’ आहे आणि ती खूप उंच आहे, असे या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी बोलताना दिसत आहे. हाच धागापकडून भाजापने ट्वीट केले आहे. कितीही किंमत मोजावी लागली तरी, मला सत्ता पाहिजे, असे राहुल गांधी सांगतात. तर, देशाची सत्ता आणि तुमच्या दरम्यान माझे 140 कोटी ‘परिवारजन’ असून मी तुम्हाला कधीच हा देश तोडू देणार नाही, असे मोदी यांनी सुनावले असल्याचे या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -