Thursday, May 16, 2024
घरमानिनीHealthवारंवार विसरण्याची सवय असू शकते Dementia चे लक्षण

वारंवार विसरण्याची सवय असू शकते Dementia चे लक्षण

Subscribe

आपण दररोज खुप काही कामांमध्ये व्यस्त असतो. अशातच एखादे काम करायला सुद्धा विसतो. मात्र विसरण्याची सवय अधिक वाढली गेली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तर अल्जाइमर आजारानंतर लेवी बॉडी डिमेंशिया हा दुसऱ्या स्थानावर आहे. प्रत्येकालाच कधी ना कधी झोपताना फार समस्या येतात. यामागील कारणे वेगळी असू शकतता. मात्र तुम्ही झोपेत एखाद्याला पाय पारता, झोपेत बोलता हे संकेत डिमेंशाच्या आजाराचे असू शकतात. डिमेंशियाचे रुग्ण काही गोष्टी विसरतात. त्या पुन्हा आठवणे त्यांना कठीण ही काहीवेळेस होते.

जेव्हा आपल्याला स्वप्न पडतात तेव्हा आपण त्यामध्ये ऐवढे हरवले जातो की, कधीकधी झोपेत आपल्या तोंडून शब्द निघतात. आपण संवाद करतोय असे बाजूच्या व्यक्तीला वाटते. REM झोप ही आपल्या झोपेच्या पाच टप्प्यांपैकी एक आहे. ती सर्वसामान्यपणे आपण जेव्हा झोपतो त्याच्या 90 मिनिटांनी सुरु होते. जेव्हा आपण आरईएम मध्ये प्रवेश करतो तेव्हा पूर्णपणे गाढ झोपत नाहीत. कारण यावेळी मेंदूचे कार्य पुन्हा एकदा वाढले जाते. जेव्हा तुम्ही जागे असता तेव्हा गतीविधी या समान होत असतात. याच कारणास्तव आरईएम झोप तेव्हा येते विचित्र स्वप्न पडतात. मेयो क्लिनिकने दावा केला आहे की, लेवी बॉडी डिमेंशिया रॅपिड आय मुवमेंट म्हणजेच आरईएम स्लीप बिहेवियर डिसऑर्डरचे कारण बनू शकते. त्यामुळे तुम्हाला वाईट स्वप्न पडतात.

- Advertisement -

तर स्वप्न पाहताना लोक अशा प्रकारचे काही काम करतात जसे की, बेडवरच झोपेत जोरात बोलणे किंवा एखादी हालचाल करणे. जसे की, ते त्या स्वप्नात पाहत होते. यामुळे झोपेच्या या सवयीला डिमेंशियाच्या धोक्याशी जोडले जात आहे. अपुरी झोप हे मानसिक आरोग्याच्या विकासावर परिणाम करते. त्यामुळे असे समजू शकतो की, झोपेच्या कमतरेमुळे उदास वाटणे, चिंता किंवा काही मानसिक आरोग्यासंबंधित समस्या सुद्धा उद्भवू शकतात. अनिद्रा हे मानसिक रोगांचे संकेत असू शकते.


हेही वाचा- पर्सनल स्पेस आणि प्रायव्हसीच्या कमतरतेमुळे होतो मानसिक आरोग्यावर परिणाम

- Advertisment -

Manini