Saturday, May 4, 2024
घरमानिनीHealthपर्सनल स्पेस आणि प्रायव्हसीच्या कमतरतेमुळे होतो मानसिक आरोग्यावर परिणाम

पर्सनल स्पेस आणि प्रायव्हसीच्या कमतरतेमुळे होतो मानसिक आरोग्यावर परिणाम

Subscribe

सध्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे जगण्याची पद्धत ही बदलली गेली आहे. प्रत्येकाला जगण्यासाठी मोकळीक हवीयं. मात्र भारतीय परिवारांमध्ये असे होत नाही. काही बंधन ही लादली जातात. त्यामुळे कधी कधी असे होते की, आपली पर्सनल लाइफ आणि प्रायव्हेसी यामध्ये हरवली जातेय का? असा प्रश्न पडू लागतो.

खासकरुन एकत्रित कुटुंबात तुम्हाला तुमची पर्सनल स्पेस आणि प्रायव्हसी मिळण्याची शक्यता फार कमी असते. यामुळे एका वेळेनंतर याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो आणि वाद वाढले जातात.

- Advertisement -

साउथ एशियन कल्चर सोडून अन्य कल्चरमध्ये जेव्हा एखादा व्यक्ती आपल्या वयाची 18 वर्ष पूर्ण करतो तेव्हा परिवाराला वाटते की, तो आता मोठा झाला आहे. परंतु भारतात अशा प्रकारची कॉन्सेप्ट सर्वच परिवारांना पटत नाही. जरी तुम्ही वयाची पंन्नाशी पार केलात तरीही तुम्ही लहानच आहात असा ही कधीकधी अनुभव येतो.

- Advertisement -

मानसिक आरोग्यासाठी पर्सनल स्पेस गरजेची
खरंतर आपल्या मानसिक आरोग्यासाठी पर्सनल स्पेस गरजेची आहे. अन्यथा तुम्ही नेहमीच चिडचिडे आणि एंजायटचा अनुभव येतो. यामुळे कोणतेही काम करताना ते मन लावून करता येणार नाही. अशातच स्वत:ला ओळखा आणि त्यावर काम करण्यासाठी थोडावेळ काढा.

मानसिक स्वातंत्र्यांसाठी समस्यांचा सामना करावा लागेल
या समस्येतून बाहेर येण्यासाठी तुम्हाला घरातील मंडळीशीं खुल्यापणाने बोलावे लागेल. संवाद साधला तरच काहीतरी तोडगा निघू शकतो. जर तुम्हाला पर्सनल स्पेस मिळत नसेल तर परिवाराशी बोला. कधीकधी समस्या येतील. पण तुम्हाला आयुष्यात पुढे जायचे असेल आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर हे जरुर करावे लागेल.


हेही वाचा- ‘या’ कारणामुळे मुलींना नसतो नात्यावर विश्वास

- Advertisment -

Manini