घरपालघरMeera-Bhayander News: हरित लवादाच्या आदेशाचा विसर

Meera-Bhayander News: हरित लवादाच्या आदेशाचा विसर

Subscribe

महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केल्या जाणार्‍या रस्ते, गटार व पॅचवर्कच्या कामा वेळी थेट झाडांचेच डांबरीकरण व काँक्रीटीकरण केले जात आहे. झाडांच्या सभोवतालची जागा ही मोकळी ठेवणे आवश्यक असते.

भाईंदर :- मीरा- भाईंदर शहरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नवीन सिमेंट काँक्रीट रस्ते आणि त्यालगत असलेले गटारे नव्याने बनविण्याचे कामे सुरू आहे. त्यात हरित लवादाने झाडांचे बुंधे मोकळे सोडून त्याठिकाणी एक मिटर बाय एक मिटर इतकी जागा मोकळी सोडून त्याठिकाणी सिमेंट काँक्रीट अथवा डांबर टाकण्यास सांगितले होते.परंतु, दोन्हीही विभागाकडून त्याठिकाणी झाडाच्या बुडाखालीच दगड व खडी आणि सिमेंट काँक्रीट टाकण्याचे काम सुरू आहे. तसेच याच झाडांच्या बुद्यांना संरक्षण आळे बनवून त्यात माती टाकण्यासाठी मागील तीन चार वर्षांपूर्वी करोडो रुपये खर्च केला होता. आता त्याचाही नवीन रस्ते बनविणार्‍या ठेकेदारांकडून नासधूस करुन त्यात दगड खडी टाकली जात आहे, या मुळे झाडांच्या नैसर्गिक वाढीवर आणि मजबुतीकरणावर विपरित परिणाम होणार आहे.महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केल्या जाणार्‍या रस्ते, गटार व पॅचवर्कच्या कामा वेळी थेट झाडांचेच डांबरीकरण व काँक्रीटीकरण केले जात आहे. झाडांच्या सभोवतालची जागा ही मोकळी ठेवणे आवश्यक असते.

परंतु डांबरीकरण व काँक्रीटीकरण केल्याने झाडांना मिळणारी हवा, पाणी व पोषकत्त्व यांच्यावर विपरीत परिणाम होतो. तर काही ठिकाणी तर झाडाच्या बुंध्या जवळ डेब्रिज, विटा आदी झाडांमध्ये टाकले जाते. त्याचा झाडांच्या मजबुतीकरण व वाढीवर देखील गंभीर परिणाम होत असतो. त्यात हरित लवादाचे सक्त आदेश असतानाही त्याला पालिका व एमएमआरडीएने केराची टोपली हे दोन्हीही विभाग दाखवत आहेत.शहरात जागोजागी झाडांचे काँक्रीटीकरण व डांबरीकरण चालले असताना माजी नगरसेवक, पालिका अधिकारी व बडे राजकारणी या कडे सोयीस्कर डोळेझाक करतात. त्यामुळे झाडांच्या बुंध्या भोवती काँक्रीट – डांबरीकरण प्रकरणी संबंधित मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाचे ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर नागरी झाडांचे जतन व संवर्धन अधिनियमा नुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी सातत्याने होत आहे.

- Advertisement -

 

शहरात नवीन सिमेंट काँक्रीट रस्ते बनविताना झाडांच्या सभोवताली बांधताना 1 बाय 1 मीटरचे क्षेत्र खुले ठेवणे आवश्यक आहे. या आधी देखील झाडांच्या बुंध्याशी पालिका ठेकेदारांनी डांबर, काँक्रीट, खडी टाकून झाडांच्या नैसर्गिक वाढीला धोका निर्माण केला असल्याने त्यांच्यावर आणि आता नव्याने काम करत असलेल्या सर्व ठेकेदार व पालिका आणि एमएमआरडीए अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करून सदरील झाडे असतील त्या ठिकाणच्या जागा तात्काळ मोकळ्या कराव्यात.

- Advertisement -

– धीरज परब, पर्यावरण प्रेमी

 

आम्ही यापूर्वीच सर्व ठेकेदारांना नियमांना धरून कामे करण्याचे सांगितले आहे. त्यात जर कोणी नियमांचे उल्लंघन करत असेल तर आमचा उपअभियंता व कामावरील कन्सलटंट यांना सांगून लगेच कामाची पाहणी करून झाडांचे बुंधे मोकळे करण्यास सांगण्याचे आदेश देतो.

– अजय तितरे, कार्यकारी अभियंता, एमएमआरडीए

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -