Friday, May 17, 2024
घरमानिनीHealthतुमचे पाळीव प्राणीसुद्धा होऊ शकतात डिमेंशियाचे शिकार

तुमचे पाळीव प्राणीसुद्धा होऊ शकतात डिमेंशियाचे शिकार

Subscribe

आतापर्यंत आपल्या सर्वांना माहिती होते की, अल्जाइमर आणि डिमेंशियाचा आजार केवळ व्यक्तींनाच होतो. या समस्यांचा सामना व्यक्ती वाढत्या वयासह करतो. मात्र तुम्हाला माहितेय का, पाळीव प्राणी जसे की, कुत्रा आणि मांजर यांना सुद्धा हा आजार होऊ शकतो. नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून असे समोर आले की, वाढत्या वयासह त्यांना सुद्धा मानसिक समस्या होऊ शकतात. हे गरजेचे नाही की, सर्वच प्राण्यांना हा आजार होऊ शकतो.

- Advertisement -

एका युनिव्हर्सिटीने पाळीव प्राण्यांवर सर्वे केला. त्यानुसार असे समोर आले की, त्यांना सुद्धा गोष्टी विसरण्याची समस्या येऊ शकते. त्यांच्यामध्ये भ्रमित आणि भटकल्यासारखी लक्षणे दिसतात. त्यांच्या झोपण्या-खाण्याच्या पॅटर्नमध्ये ही बदल होतो. अशा एकूणच स्थितीमुळे त्यांच्यात ही डिमेंशियाची लक्षणे दिसून येऊ शकतात.

- Advertisement -

पाळीव प्राण्यावर करण्यात आलेल्या डिमेंशियाच्या अभ्यासानुसार त्यांच्या माध्यमातून या आजाराबद्दल काही गोष्टी कळण्यास सोप्पे होऊ शकते. त्यांच्यामध्ये सुद्धा मनुष्यांप्रमाणे काही गोष्टी घडतात. संशोधक पाळीव प्राण्यांच्या मृत्यूनंतर ब्रेन टिश्यूचे विश्लेषण करत आहेत. यामध्ये कुत्र्यांच्या नमुन्याची तुलना अशा लोकांसोबत करण्यात आली ज्यांना डिमेंशिया होता. यामुळे उत्तम पद्धतीने कळू शकते की, कुत्र्याच्या मेंदूचे वय कशा प्रकारे वाढले जाते.


हेही वाचा- Uric Acide चा स्तर सामान्य करण्यासाठी सोप्या टीप्स

 

- Advertisment -

Manini