Wednesday, May 31, 2023
घर मानिनी Health बर्फ टाकून उसाचा रस म्हणजे पोटात गडबड

बर्फ टाकून उसाचा रस म्हणजे पोटात गडबड

Subscribe

उन्हाळ्यात घरातून बाहेर पडल्यानंतर कधीकधी खुप तहान लागते. त्यामुळे तहान भागवण्यासाठी आपण उसाचा, फळांचा किंवा लिंबू सोडा पितो. परंतु या सर्वांमध्ये एक सर्वसामान्य गोष्ट अशी असते की, म्हणजे बर्फ. उन्हाळ्यात बहुतांश जण घरात बर्फ टाकून पाणी पिणे पसंद करतात. तर काहींना चहा ऐवजी आयइस टी पिणे आवडते.

परंतु तुम्हाला माहितेय का बर्फाचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो? सर्दीःखोकला तर होतोच पण अन्य नुकसान ही होते. घरातील फ्रिजमधील बर्फ हा आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक आहे.

- Advertisement -

जेव्हा आपण उन्हात बाहेर फिरत असतो तेव्हा बर्फ टाकून दिलेला ज्यूस पितो. आपल्याला असे वाटते की, थंडावा मिळेल. परंतु यामुळे शरिराचे तापमान बिघडले जाते. अशातच आपण आजारी पडतो. आपली पाचनक्रिया बिघडते. तसेच बर्फ हा स्वच्छ पाण्याचा तयार केलेला नसेल तर त्यापासून हेपेटाइटिस ए आणि ई वायरस होण्याचा धोका असतो. काही वेळेस घरातील फ्रिजमध्ये सुद्धा खुप काळ बर्फ आपण असाच ठेवतो. परंतु तेथे ही अस्वच्छता असते, त्यामुळे आपण आजारी पडतो. जॉन्डिस होण्यामागे हे सुद्धा एक कारण आहे.

- Advertisement -

दुसरे म्हणजे ज्या लोकांना मायग्रेनची समस्या असते त्यांना अधिक त्रास होतो. जेव्हा तुम्ही थंड पाणी पिता तेव्हा तुमचे नाक आणि रेस्पिरेटरी ट्रॅक्टला ब्लॉक होते. अशातच मायग्रेनचे दुखणे वाढते. बर्फ असणारा ज्यूस किंवा पाणी प्यायल्याने नाकात रेस्पिरेटरी म्युकोस तयार होतो. जे रेस्पिरेटरी ट्रॅक्टची एक प्रोटेक्टिव्ह लेअर असते. जेव्हा ही लेअर जमा होते तेव्हा रेस्पिरेशन म्हणजेच श्वास घेण्यास समस्या उद्भवते. रेस्पिरेटरी ट्रॅक्ट काही संक्रमणाच्या संपर्कात आल्याने गळ्यात खवखव होते.

खरंतर बर्फ असणारे पाणी अथवा ज्यूस आपल्या शरिराला योग्य प्रकारे हाइड्रेट करु शकत नाही. कधी कधी खाल्ल्यानंतर लगेच बर्फाचे पाणी पिण्यापासून दूर रहावे. यामुळे शरिराला नुकसान पोहचू शकते.


हेही वाचा- Pregnancy Tips : गर्भवती महिलांनी काळा चहा पिणे कितपत फायदेशीर ?

- Advertisment -

Manini