Wednesday, May 1, 2024
घरमानिनीBeautyकेसांना नारळाचे दूध लावताना 'या' टिप्स फॉलो करा

केसांना नारळाचे दूध लावताना ‘या’ टिप्स फॉलो करा

Subscribe

आपण सर्वजण स्वयंपाकघरात अनेक पदार्थ बनवण्यासाठी नारळाचे दूध वापरतो. अशातच नारळातील पोषक तत्वांमुळे नारळाचे दूध केसांवर लावणे खूप चांगले मानले जाते. नारळाचे दूध केवळ तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ आणि कंडिशन करत नाही तर त्यात व्हिटॅमिन ई, लोह आणि प्रथिने असल्यामुळे केसांच्या वाढीसाठी हे नारळाचे दूध अतिशय फायदेशीर आहे.

तसेच नारळाच्या दुधात अँटीऑक्ससिडंट गुणधर्म देखील आढळतात. जे टाळूतील कोंडा आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. नारळाच्या दुधाचे एक वैशिष्ट्य म्हणजे तेलकट ते कोरडे तसेच कुरळे ते सरळ अशा सर्व प्रकारच्या केसांसाठी फायदेशीर आहे. पण जेव्हा तुम्ही तुमच्या केसांच्या निगा राखण्याच्या रुटीनमध्ये याचा समावेश करता तेव्हा तुम्ही काही छोट्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. तर, आता आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ते म्हणजे केसांना जेव्हा नारळाचे दूध लावाल तेव्हा या टिप्सच्या मदतीने केसांची अशी घ्या काळजी.

- Advertisement -

How To Use Coconut Milk For Hair Growth | DIY Hair Mask For Dry, Damaged &  Frizzy Hair - YouTube

‘अशा’ प्रकारे घ्या काळजी

  • जर तुम्ही तुमच्या केसांना नियमित नारळाचे दूध लावत असाल आणि त्यातून चांगले परिणाम मिळवायचे असतील तर नेहमी दुधाच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष द्या.
  • तसेच नारळाचे दूध लावताना नेहमी ताजे आणि सेंद्रिय नारळाचे दूध वापरा.
  • महत्वाचे म्हणजे कॅन मधले दूध न वापरण्याचा प्रयत्न करा.
  • कारण हे दूध प्रिझर्वेटिव्ह स्वरूपात असते. जे टाळूच्या त्वचेसाठी चांगले नसते.
  • नारळाचे दूध केसांसाठी खूप फायदेशीर असले तरी ते सगळ्यांच्या केसांसाठी सूट होत नाही.
  • अशातच जर का तुम्ही पहिल्यांदाच नारळाचे दूध वापरत असाल तर एकदा टाळूची स्कॅल्प टेस्ट करा.
  • पहिल्यांदा जर का तुम्ही हे नारळाचे दूध लावत असाल तर ते छोट्या भागावर लावण्याचा प्रयत्न करा.
  • तसेच जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असेल किंवा स्किनच्या कोणत्याही समस्या असतील तर नारळाचे दूध वापरणे टाळा.

9 Benefits Of Coconut Oil For Your Hair – Vedix

- Advertisement -

केसांच्या प्रकारानुसार नारळाचे दूध वापरा

  • नारळाचे दूध कोणत्याही प्रकारच्या केसांवर लावले जाऊ शकते, परंतु तरीही ते वापरताना विशेष काळजी घ्या.
  • नारळाच्या दुधात नैसर्गिक फॅट खूप जास्त प्रमाणात आढळतात.
  • म्हणून, जर तुमचे केस तेलकट असतील तर ते कमी प्रमाणात वापरा.
  • तसेच अशा टाळूवर नारळाचे दूध जास्त प्रमाणात लावल्याने केस खूप तेलकट आणि स्निग्ध दिसू शकतात.

Hair care tips: 7 homemade hair care mask recipes for healthy hair this  summer | Fashion Trends - Hindustan Times

नारळाचे दूध लावल्यानंतर असे धुवा केस

  • नारळाचे दूध फक्त योग्य प्रकारे लावणे आवश्यक नाही तर ते धुणे देखील आवश्यक आहे.
  • सर्वप्रथम, पाण्याने केस पूर्णपणे स्वच्छ धुवा. यानंतर केस सौम्य शाम्पूने चांगले धुवा.
  • जर का नारळाचे दूध तुमच्या केसांमध्ये राहिल्यास तुमच्या केसांना याचा घाण वास येऊ शकतो.
  • त्यामुळे हा उपाय जर का तुम्ही करत असाल तर विशेष काळजी घेणे फार गरजेचे आहे.

हेही वाचा : हेअर सायकलिंग म्हणजे काय

- Advertisment -

Manini