Monday, May 6, 2024
घरमानिनीRelationshipनाते दीर्घकाळ टिकवण्यासाठी गोल्डन रुल्स

नाते दीर्घकाळ टिकवण्यासाठी गोल्डन रुल्स

Subscribe

प्रत्येक रिलेशनशिपमध्ये वाद-भांडण होतात. मात्र प्रेम हे या कारणामुळे कधीच कमी होत नाही, उलट वाढले जाते असे म्हटले जाते. नात्यात जर तुम्ही एकमेकांना समजून घेतले, एकमेकांना सन्मान दिला तर नाते दीर्घकाळ टिकू शकते. मात्र कधीकधी असे होते की, पार्टनरचे एकमेकांसोबत पटत नाही. याला कारणीभूत काही शुल्लक कारणे सुद्धा असू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला तुमचे नाते दीर्घकाळ टिकवून ठेवायचे असेल तर पुढील काही गोल्डन रुल्स नक्कीच फॉलो करा. (Golden rules for relationship)

-अहंकारापासून दूर रहा
अहंकारामुळे नात्यात गैरसमज निर्माण होतात. त्यामुळे पार्टनरसोबत नाते अधिक घट्ट करायचे असेल तर ही भावना तुमच्या नात्यात येऊ देऊ नका. जर पार्टनर तुमच्या एखाद्या गोष्टीमुळे नाराज झाला असेल तर त्याच्याशी वाद घालण्याऐवजी चुकी स्विकारा.

- Advertisement -

-भावनात्मक रुपात जोडले जा
मजबूत रिलेशनशिपसाठी तुम्ही उत्तम सेक्स लाइफसह भावनात्मक रुपात ही जोडले जा. इमोशनली कनेक्ट झाल्याने पार्टनरला व्यवस्थितीत समजून घेता येईल. त्याचसोबत नात्यातील समस्या ही दूर होतात. ज्या कपल्समध्ये एकमेकांच्या भावनांचा सन्मान दिला जात नाही तसे नाते दीर्घकाळ टिकू शकत नाही.

- Advertisement -

-नात्यात इमानदारीने वागा
कोणत्याही नात्याचा पाया हा इमानदारी असतो. नात्यात तुम्ही इमानदारीने वागला नाहीत तर नाते दीर्घकाळ टिकण्याऐवजी मोडले जाईल. मात्र इमानदारीने पार्टनरशी सर्वकाही शेअर केले तर तुमचे नाते नक्कीच दीर्घकाळ टिकेल. त्याचसोबत तुमचा एकमेकांवरील विश्वास ही वाढला जाईल.

-एकत्रित समस्यांवर तोडगा काढणे
जर तुम्हाला तुमच्या पार्टनरने तुमच्यासोबत सर्वकाही शेअर करावे असे वाटत असेल तर तुमच्या समस्या सुद्धा त्याला सांगा. दोघांनी मिळून त्या समस्यांवर तोडगा काढा. यावेळी एकमेकांना जज करु नका.

-स्वातंत्र्य द्या
जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा पार्टनरने एकमेकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. जर तुम्ही पार्टनरला बंधनात ठेवत असाल तर नात्यात प्रेम कमी आणि वाद अधिक वाढले जातील. त्यामुळे पार्टनरला त्याला जसे हवे तसे वागण्याचे स्वातंत्र्य द्या. मात्र याचा गैरफायदा पार्टनरने घेऊन दुसऱ्या पार्टनरला फसवू नये.


हेही वाचा- Ego मुळे नातेसंबंधात येतोय दुरावा, असे ओळखा

- Advertisment -

Manini