Saturday, April 13, 2024
घरमानिनीRelationshipघरकामात द्या पत्नीला हात, मिळेल आयुष्यभराची साथ

घरकामात द्या पत्नीला हात, मिळेल आयुष्यभराची साथ

Subscribe

सध्याच्या वाढत्या महागाईमुळे उत्तम भविष्यासाठी पती आणि पत्नी अशा दोघांनी नोकरी करणे गरजेचे झाले आहे. त्याचबरोबर मुलांप्रमाणेच मुलीही उच्च शिक्षण घेत असल्याने स्वावलंबनासाठी नोकरी करण्याकडे महिलांचा ओढा वाढला आहे. यामुळे कामावरून दमून भागून आल्यावर घरातील कामं कोणी करायची यावरून दोन्ही पार्टनरमध्ये टोकाचे वाद होऊ लागले आहेत.

- Advertisement -

परिणामी याचे गंभीर परिणाम त्यांच्या वैवाहीक आयुष्यावर होऊ लागले आहेत. पण जर दोघांनी वाद न घालता सामंजस्याने यातून मार्ग काढल्यास नात्यातील तणाव सहज निवळणे शक्य आहे. त्यासाठी जोडप्यातील दोघांनी अहंकार बाजूला ठेवायला हवा.

- Advertisement -

तसेच महिलेनेही पती घरकामात मदत करत असल्यास त्याच्या कामाचेही कौतुक करावे. जेणेकरून त्यांच्यात मैत्रीचे नाते निर्माण होते जे त्यांच्या दाम्पत्य जीवनासाठी अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी दोघांनी कामाच्या जबाबदाऱ्या वाटून घ्याव्यात. जेणेकरून एकावरच कामाचा ताण येणार नाही. कारण दोघेही वर्कींग असतील तर साहजिकच दिवसभर ऑफिसमध्ये काम केल्यावर पुन्हा थकून भागून घरी आल्यावर काम करणे तसे सोपे नसते.

यासाठी कामाचे टाईम टेबल करावे. घरकाम करण्यास जर बाई असेल तर कामाचा बोझा थोडा कमी होईलच. पण घरची काम कधीच संपत नसतात.

त्यासाठी बाहेरची काम कोणं करेल जसे भाजीपाला,दूध, वाणसामान, दळणवळण कोणं करेल ते ठरवावे.

तसेच घरात स्वयंपाक करणे, आणि संपूर्ण घराची स्वच्छतेची जबाबदारी कोण घेणार ते ठरवणं. त्यानुसार वेळा ठरवून कामांची आखणी करावी.

बाईने सुट्टी घेतल्य़ास कोणी कोणते काम करावे यावरही दोघांनी बोलावे. वाद घालू नये.

अशा पद्धतीने काम वाटून घेतल्यास दाम्पत्य जीवन आनंदात व्यतित करणे सहज शक्य आहे आहे.

 

- Advertisment -

Manini